AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अर्जुन रामपालच्या घरी सापडलेलं ट्रेमाडॉल औषध नेमकं काय?

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल याची आज ड्रग्स प्रकरणात सहा तास चौकशी झाली.

अर्जुन रामपालच्या घरी सापडलेलं ट्रेमाडॉल औषध नेमकं काय?
Follow us
| Updated on: Dec 21, 2020 | 8:07 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल (Arjun Rampal) याची आज ड्रग्स प्रकरणात सहा तास चौकशी झाली. एनसीबीच्या (Narcotics Control Bureau) अधिकाऱ्यांनी ही चौकशी केली. अर्जुन रामपाल याच्या घरी ट्रेमाडॉल हे बंदी असलेलं औषध सापडलं आहे. याबाबत अर्जुन याच्याकडून योग्य खुलासा न झाल्याने त्याची आज चौकशी करण्यात आली. (What exactly is the tramadol drug found in Arjun Rampal’s house?)

अभिनेता अर्जुन रामपाल याचा मेहुणा अजिसिलिओस याच्या घरी मोठ्या प्रमाणात ड्रग्स सापडले होते. त्यानंतर अर्जुन रामपालही एनसीबी अधिकाऱ्यांच्या रडारवर आला होता. एनसीबी अधिकाऱ्यांनी अर्जुन याच्या घरी धाड टाकली असता त्या ठिकाणी ट्रेमाडॉल हे बंदी असलेलं औषध सापडलं होत. त्या अनुषंगाने सुरुवातीला अर्जुन याची लिव्ह इन मधील पार्टनर गॅब्रिएला हिची दोन वेळा चौकशी झाली होती. त्यानंतर अर्जुन रामपाल याला चौकशीसाठी एनसीबी कार्यलयात बोलावलं होतं.

एनसीबीकडून 13 नोव्हेंबर रोजी अर्जुन याची चौकशी करण्यात आली होती. या चौकशीनंतरही अर्जुन रामपाल याच्याविरोधात काही पुरावे एनसीबी अधिकाऱ्यांना मिळाले होते. तसेच त्याच्या स्टेटमेंटमध्ये विसंगती असल्याचे आढळून आले आहे. दरम्यान, अर्जुन याच्या घरी बंदी असलेल्या ट्रेमाडॉल हे ड्रग्ससदृश्य औषध सापडलं होतं, याबाबत आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हे औषध घेत असल्याचे रामपाल याने चौकशीत सांगितलं होतं. या औषधाबाबत त्याने डॉक्टरांची चिठ्ठीदेखील सादर केली होती. त्यानंर अर्जुन रामपाल याला एनसीबी अधिकाऱ्यांनी समन्स देऊन चौकशीसाठी 16 डिसेंबर रोजी बोलावलं होतं.

मुंबईच्या बाहेर असल्याने 16 डिसेंबर रोजी अर्जुन रामपाल चौकशीसाठी हजर झाला नाही. त्यावेळी त्याने तसं एनसीबीच्या अधिकाऱ्यांना कळवलं होतं, तसेचच 22 डिसेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहणार असल्याचं त्याने कबूल केलं होतं, मात्र, अर्जुन आजच चौकशीसाठी हजर झाला. आज अर्जुन याची सहा तास चौकशी करण्यात आली. त्याला पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावंल जाण्याची श्यक्यता आहे.

अर्जुन रामपाल बॉलीवूडमधील अशा कलाकारांपैकी एक आहे ज्याचे नाव याअगोदर कधी वादात आले नव्हते. परंतु ड्रग्स प्रकरणात त्याचे नाव आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. याप्रकरणी 22 डिसेंबर रोजी अर्जुनला दुसऱ्यांदा चौकशीसाठी बोलवण्यात आले होते, परंतु त्याला एनसीबीने आज म्हणजे 21 डिसेंबर रोजी समन्स बजावले. अर्जुन रामपालची 16 नोव्हेंबर रोजी प्रथम चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची काही इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे एनसीबीने जप्त करुन फॉरेन्सिक्ससाठी पाठवली होती.

अर्जुन रामपालच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणातून तपास यंत्रणेला काही नवीन पुरावे मिळाल्याची माहिती प्रसारमाध्यमांच्या वृत्तांद्वारे समोर आली आहे. तसेच काही माध्यमांनी दावा केला होता की, या पुराव्यांच्या आधारे अर्जुन रामपालला अटक होऊ शकते.

नेमके प्रकरण कुठून सुरू झाले पहा 1. अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या निधनानंतर हे प्रकरण सुरू झाले. सुशांतच्या मृत्यूचा तपास सुरू झाला तेव्हा त्यात ड्रग्स अँगल समोर आला. ड्रग्स अँगल समोर आल्यानंतर एनसीबीने सर्व सुत्र हाती घेतले. एनसीबीने सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीची चौकशी केली, त्यानंतर एकामागून एक अनेक खुलासे झाले. अनेक ड्रग पेडलर्स पकडले गेले.

2. त्याच्या तपासणीदरम्यान एनसीबीने नायजेरियन तरूणाला अटक केली. ओमेगा गोडविन असे याचे नाव होते. ओमेगाला एनसीबीने ड्रग्ससह अटक केली होती. पुढे चौकशी करत असताना अगिसियालोस डेमेट्रियड्सचे नाव ड्रग्जच्या प्रकरणात जोडले गेले.

3.अगिसियालोस अर्जुन रामपालची मैत्रीण गॅब्रिएलाचा भाऊ आहे. अगिसियालोस लोणावळ्यातील एका रिसॉर्टमध्ये वाढदिवसाच्या प्रोग्राममध्ये असताना त्याला अटक करण्यात आली होती. एनसीबीने अगिसियालोसकडून चरस व अल्प्रझोलमच्या काही गोळ्या जप्त केल्या आहेत.

4.एनसीबीने असा दावा केला होता की, अगिसियालोस ड्रग पेडलर्सशी संपर्क साधला होता. त्यांनी रिया चक्रवर्ती, शौविक, दिपेश सावंत आणि सॅम्युअल मिरांडा यांनी सुशांतसिंग राजपूत यांच्यासाठी ड्रग्स विकत घेतल्याचा आरोप केला होता.

5.अगिसियालोसच्या अटकेनंतर एनसीबीने अर्जुन रामपालच्या घरावर छापा टाकला. छापेमारी दरम्यान तपास अधिका्यांना अर्जुनच्या घरातून अशी काही ड्रग्ज सापडली, ज्यांची बंदी आहे आणि ती एनडीपीएस कायद्यांतर्गत आहेत. यानंतर अर्जुन रामपाल आणि त्याची प्रेमिका गॅब्रिएला यांना चौकशीचे समन्स पाठविण्यात आले.

6.16 नोव्हेंबर रोजी अर्जुन रामपालवर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी बऱ्याच तास चौकशी केली. या चौकशीदरम्यान अर्जुनने आपल्या घरातील प्रिस्क्रिप्शनची औषधे अधिकाऱ्यांना दिली होती. एनसीबीने दावा केला आहे की त्यांना हे प्रिस्क्रिप्शन खोटे आहे तसेच, अर्जुन रामपालने 16 नोव्हेंबर रोजी दिलेल्या माहितीत तफावत दिसत आहे.

संबंधित बातम्या :

Drugs Case | चौकशीची दुसरी फेरी, गॅब्रिएला पुन्हा एनसीबी कार्यालयात दाखल!

Drugs Case | अर्जुन रामपाल एनसीबी कार्यालयातून बाहेर, तब्बल 6 तास चौकशी!

Drugs Case | 7 तासांच्या चौकशीनंतर अर्जुन रामपालची सुटका, या प्रकरणाशी आपला काहीच संबंध नसल्याची प्रतिक्रिया!

(What exactly is the tramadol drug found in Arjun Rampal’s house?)

पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?.
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर.
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?.
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'.
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?.
पाकच्या उलट्या बोंबा... भारताविरोधात पाकिस्तानं घेतले 'हे' मोठे निर्णय
पाकच्या उलट्या बोंबा... भारताविरोधात पाकिस्तानं घेतले 'हे' मोठे निर्णय.
तर रक्ताचे पाट वाहतील, भारताच्या निर्णयानंतर सईदचा तो व्हिडिओ व्हायरल
तर रक्ताचे पाट वाहतील, भारताच्या निर्णयानंतर सईदचा तो व्हिडिओ व्हायरल.
'जे कधीही विमानात बसले नाही, त्यांना..' नरेश म्हस्केंचं वादग्रस्त वधान
'जे कधीही विमानात बसले नाही, त्यांना..' नरेश म्हस्केंचं वादग्रस्त वधान.
दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक? पहलगाम हल्ल्याचं दुःख नाही?
दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक? पहलगाम हल्ल्याचं दुःख नाही?.
पहलगामच्या घटनास्थळावर सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांकडून रिक्रिएशन?
पहलगामच्या घटनास्थळावर सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांकडून रिक्रिएशन?.