बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्या लग्नाबाबत अनेक बातम्या सातत्याने येत आहेत. या दोघांच्या चाहत्यांनादेखील त्यांच्या लग्नाची उत्सुकता आहे.
बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार कपूर घराण्यातील एका सदस्याने सांगितलं आहे की, "या वर्षी कोणतंही लग्न होणार नाही. कदाचित पुढच्या वर्षीदेखील लग्न नसेल. ऋषी कपूर यांचं नुकतंच निधन झालं आहे. त्यामुळे 2021 च्या मध्यापर्यंत घरात कोणाचंही लग्न होण्याचा संबंधच येत नाही. रणबीर आणि आलिया या दोघांनीही अद्याप लग्नाचा कोणताही विचार केलेला नाही".
Follow us
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्या लग्नाबाबत अनेक बातम्या सातत्याने येत आहेत. या दोघांच्या चाहत्यांनादेखील त्यांच्या लग्नाची उत्सुकता आहे.
रणबीर आणि आलिया हल्ली नेहमी एकत्र दिसतात. दोघांनी त्यांच्या रिलेशनशिपबद्दल कधीही जाहीर वाच्यता केलेली नाही. परंतु त्या दोघांचं सतत एकत्र असणं, एकमेकांच्या घरी प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होणं, बाहेर फिरणं यावरुन ते दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत, अशा बातम्या नेहमी येत असतात.
हे दोघेही या वर्षी लग्न करणार आहेत. अशा बातम्या सुरुवातीला आल्या होत्या. परंतु एप्रिल महिन्यात रणबीरचे वडील दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन झालं. त्यानंतर या बातम्या थांबल्या. तर काहींनी त्यांचं लग्न या वर्षाच्या शेवटी होईल, असं म्हटलं होतं.
रणबीर आणि आलिया या वर्षाच्या शेवटी लग्न करतील, अशा चर्चा ऐकायला मिळत होत्या. परंतु आता या चर्चा फोल ठरणार आहेत.
बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार कपूर घराण्यातील एका सदस्याने सांगितलं आहे की, “या वर्षी कोणतंही लग्न होणार नाही. कदाचित पुढच्या वर्षीदेखील लग्न नसेल. ऋषी कपूर यांचं नुकतंच निधन झालं आहे. त्यामुळे 2021 च्या मध्यापर्यंत घरात कोणाचंही लग्न होण्याचा संबंधच येत नाही. रणबीर आणि आलिया या दोघांनीही अद्याप लग्नाचा कोणताही विचार केलेला नाही”.