धारावी झोपडपट्टीतील कोरोना संसर्गावर नियंत्रण, WHO कडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं कौतुक
दिवसेंदिवस देशात आणि राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत (Corona Patient Dharavi) आहे.
दिल्ली : दिवसेंदिवस देशात आणि राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत (Corona Patient Dharavi) आहे. मुंबईतही कोरोनाच्या रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होत आहे. अशा परिस्थितीत धारावीमधील झोपडपट्टीत कोरोनावर नियंत्रण मिळवल्याबद्दल WHO ने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले (Corona Patient Dharavi) आहे.
“धारावी एक उदाहरण आहे की ज्यामध्ये कोरोनाने शिरकाव केला आणि सरकारने त्यावर नियंत्रण मिळविले”, असा कौतुकाचा वर्षाव वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे प्रमुख टेड्रोस अडॅनॉम गेब्रेयसिस यांनी केला आहे.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
मुंबईतील धारावी झोपडपट्टी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरली होती. येथे मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव पसरला होता. त्यामुळे दिवसाला मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण सापडत होते. पण मुंबई महापालिकेने येथील कोरोना संक्रमणावर नियंत्रण मिळवले आहे.
धारावी ही आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर धारावीत कोरोनाने हातपाय पसरायला सुरु केले. धारावीतील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. त्यामुळे कोरोनाला आवरणं कठीण होईल की काय याची भीती होती. गेल्या महिन्यात धारावीत दिवसाला 80 ते 90 रुग्ण आढळले होते.
त्यामुळे धारावीत कोरोनाला आवरणं कठीण झालं होतं. अगदी दाटीवाटीचा परिसर असल्याने सोशल डिस्टन्सिंग पाळणं कठीण झालं होतं. त्यानंतर पालिकेने धारावीकडे विशेष लक्ष देत अनेक उपाययोजना करण्यास सुरुवात केली. त्यामुळे आता धारावीतील आकडे कमी झाल्याचा दावा प्रशासन करत आहे.
संबंधित बातम्या :
कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीसाठी गुडन्यूज, रुग्णवाढीच्या वेगात कमालीची घट