पालघरमध्ये कामगारांचा कोका-कोला कंपनीविरुद्ध एल्गार, उपासमारीची वेळ आल्याने 131 जणांचं कुटुंबासह धरणे आंदोलन

कंपनीने 20 वर्षांपासून काम करणाऱ्या कामगारांचं अचानक काम थांबवल्याने हे आंदोलन पुकारण्यात आलं आहे (Workers protest against Coca-Cola company in Palghar).

पालघरमध्ये कामगारांचा कोका-कोला कंपनीविरुद्ध एल्गार, उपासमारीची वेळ आल्याने 131 जणांचं कुटुंबासह धरणे आंदोलन
Follow us
| Updated on: Nov 30, 2020 | 11:01 PM

पालघर : जिल्ह्यातील वाडा तालुक्यात कुडूस औद्योगिक क्षेत्रात शीतपेय बनवणाऱ्या हिंदुस्तान कोका कोला बेव्हरेज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतील 131 कामगारांनी आंदोलन पुकारलं आहे. कंपनीने 20 वर्षांपासून काम करणाऱ्या कामगारांचं अचानक काम थांबवल्याने हे आंदोलन पुकारण्यात आलं आहे (Workers protest against Coca-Cola company in Palghar).

संबंधित कामगारांनी आपल्या मागण्यांबाबत कंपनी व्यवस्थापक यांच्यासोबत चर्चा करण्याचाही प्रयत्न केला. मात्र ही बोलणी फिस्कटल्यामुळे आजपासून (30 नोव्हेंबर 2020) या 131 कामगारांनी आपल्या कुटुंबासोबत कंपनीच्या गेटसमोर धरणे आंदोलन सुरु केले आहे.

हे 131 कामगार कंपनीकडे 20 वर्षांपासून काम करत आहेत. मात्र, आता कंपनीने या कामगारांना ते कंत्राटी असल्याचं सांगत कॉन्ट्रॅक्टरचं काम बंद केलंय. अचानक कंपनीने कॉन्ट्रॅक्टरचे काम बंद केल्यामुळे या 131 कामगारांवर उपासमारीची कुऱ्हाड कोसळली आहे.

कामगार 1 नोव्हेंबरपासून कंपनी व्यवस्थापक, कामगार आणि कामगार आयुक्त यांच्यासोबत चर्चा करत होते. मात्र, अजूनही कोणताही मार्ग निघालेला नाही. कंपनी प्रशासन कामगारांना कामावर घेण्यासाठी काही अटी ठेवत आहे. यानुसार 20 वर्षांपासून काम करणाऱ्या या कामगारांना आधी कंपनीकडे  राजीनामा देण्यास सांगण्यात आलं आहे. त्यानंतर कंपनी या कामगारांना नव्याने कामावर घेणार आहे.

कंपनीची ही अट मान्य केल्यास या कामगारांच्या 20 वर्षांच्या कामाचा काहीही फायदा मिळणार नाही, असं मत कामगारांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळे कंपनीत 20 वर्षांच्या मेहनतीवर पाणी फिरवावे लागेल म्हणून कामगारांनी कंपनीच्या या अटी अमान्य केल्या आहेत. दुसरीकडे कोकाकोला कंपनी कामगारांच्या या आंदोलनावर बोलण्यास तयार नाही (Workers protest against Coca-Cola company in Palghar).

हेही वाचा : कंटेन्मेंट झोनमधील सर्व दुकानं बंद, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाकडून नव्या गाईडलाईन्स जारी

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.