साडेतीन हजार टन सोन्याच्या खाणीवर विषारी सापांचा पहारा, सोनं काढायचं कसं? सरकारपुढे आव्हान

उत्तर प्रदेशमधील सोनभद्र येथे शास्त्रज्ञांना मोठी सोन्याची खाण सापडली आहे (Gold Mine found in Sonbhadra).

साडेतीन हजार टन सोन्याच्या खाणीवर विषारी सापांचा पहारा, सोनं काढायचं कसं? सरकारपुढे आव्हान
Follow us
| Updated on: Feb 22, 2020 | 10:29 PM

लखनौ : उत्तर प्रदेशमधील सोनभद्र येथे शास्त्रज्ञांना मोठी सोन्याची खाण सापडली आहे (Gold Mine found in Sonbhadra). या खाणीत तब्बल साडेतीन हजार टन सोनं असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, ज्या भागात हे सोनं आहे तिथे विषारी साप असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या खाणीचं उत्खनन करण्याअगोदर केंद्र सरकारपुढे या विषारी सापांचं मोठं आव्हान आहे.

शास्त्रज्ञांना सोनभद्रतील दोन जागांवर सोन्याच्या खाणी (Gold Mine found in Sonbhadra) असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, ज्या भागात या खाणी आहेत नेमकं त्याचजागी मोठ्या प्रमाणात सापांचा वावर आहे. हे साप एखाद्या फौजेसारखं सोन्याच्या खाणीवर पहारा करत आहेत. विशेष म्हणजे या भागात जगातील सर्वात विषारी सापांची प्रजाती असलेले साप मोठ्या प्रमाणात आहेत.

सोनभद्रच्या सोन्याची खाण असलेल्या परिसरात कोब्रा, मण्यार आणि घोणस या विषारी सापांच्या प्रजातीमधील साप मोठ्या प्रमाणात आहेत. हे साप सोनभद्रच्या सोन्याची खाण असलेल्या विढंमगंज चोपन ब्लॉकमध्ये सर्वाधिक प्रमाणात आहेत. सापांची घोणस ही प्रजात जगातील सर्वात विषारी सापांच्या प्रजातींपैकी एक मानली जाते.

दरम्यान, या प्रजातींच्या सापांचा आकडा नेमका किती आहे? याबाबत निश्चित अशी माहिती मिळालेली नाही. सोनभद्रच्या वन विभागाच्या एका अधिकाऱ्याला याबाबत विचारलं असता, सोनं काढताना वन विभागातून जेव्हा एनओसी घेतली जाईल तेव्हा विषारी सापांचा खरा आकडा समोर येईल, असं त्यांनी सांगितलं. याशिवाय विभागीय वन अधिकाऱ्याने त्या भागात घोणस, कोब्रा आणि मण्यार जातीचे साप आढले असल्याची माहिती दिली.

सोनभद्र जिल्ह्यात सोन्याची खाण असल्याची माहिती समोर येताच ते सोनं खाणीतून बाहेर काढण्याची औपचारिक प्रक्रिया सरकारने सुरु केली आहे. खाणीचं उत्खनन करण्याअगोदर जिओ टॅगिंगची कारवाई सुरु करण्यात आली. सोन्याची खाण असलेल्या परिसराचं हवाई सर्वेक्षण करण्यात आलं आहे. या सर्वेक्षणासाठी उत्तर प्रदेश सरकारने दोन हेलिकॉप्टरची मदत घेतली.

संबंधित बातमी : साडेतीन हजार टन सोने असलेला डोंगर सापडला!

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.