चीन युद्धाचं रणशिंग फुंकण्याच्या तयारीत, जिनपिंग यांचं सैनिकांना पत्र, कुटुंबियांना अखेरचा संदेश लिहिण्याचं आवाहन
चीननं युद्धाचं रणशिंग फुंकण्याची तयारी केली आहे (Xi Jinping letter to soldiers). चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी चिनी सैनिकांना पत्र पाठवलं आहे.
बीजिंग (चीन) : चीननं युद्धाचं रणशिंग फुंकण्याची तयारी केली आहे (Xi Jinping letter to soldiers). चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी चिनी सैनिकांना पत्र पाठवलं आहे. या पत्रात जिनपिंग यांनी सैनिकांना कुटुंबियांसाठी अखेरचा संदेश लिहिण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे युद्धाची ठिणगी कधीही पडू शकते, याचे संकेत चीन सरकारनं आपल्या जवानांना दिले आहेत. फुजियान प्रांतात तैनात जवानांना हे आवाहन करण्यात आलं आहे (Xi Jinping letter to soldiers).
शी जिनपिंग यांच्या पत्राची बातमी पुराव्यांसकट ‘तैवान टाईम्स’मध्ये छापून आली आहे. हे तैवानमधलं सर्वात मोठं आणि विश्वसनीय वृत्तपत्र आहे. कोणत्याही क्षणी दक्षिण चिनी समुद्रात उतरावं लागेल, त्यामुळे सैन्याला अलर्ट राहण्याच्या सूचनासुद्धा त्या पत्रात करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा : उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग कोमात, सत्तेची सूत्रे बहिणीकडे, भावापेक्षा बहीण जास्त क्रूर
चीनच्या तयारीची झलक दक्षिण चिनी समुद्रात स्पष्ट दिसत आहे. चार आठवड्यांच्याआत चीननं चौथ्यांदा समुद्रात युद्धसराव सुरु केला आहे. जमीनीबरोबरच पाण्यात चालणारी जहाजं चीननं तैनात केली आहेत. व्हिएतनामला लागून असलेल्या समुद्रात चीननं बॉम्बवर्षाव करणारी विमानं उभी केली आहेत. याच पार्श्वभूमीवर व्हिएतनामचे राजदूत भारताच्या परराष्ट्र विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटले. वर-वर ही बैठक औपचारिक सांगितली गेली. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार, बैठकीत दक्षिण चिनी समुद्रात चीनच्या कुरघोडींवर चर्चा झाली.
व्हिएतनामला लागून असलेल्या समुद्रात प्रचंड तेल आणि गॅस आहे. त्याच्या उत्खननासाठी व्हिएतनाम भारतासोबत भागीदारी करण्यासाठी हात पुढे केला आहे. यावरुन चीननं अनेकदा दबावसुद्धा टाकून बघितला. मात्र व्हिएतनाम मागे हटला नाही. भारतानं याआधीच व्हिएतनामला 10 पेट्रोलिंग बोट्स खरेदीसाठी मदत केली आहे. त्यानंतर पुन्हा एकदा व्हिएतनाम शस्र खरेदी आणि सुरक्षा कराराबाबत भारताशी चर्चा करतोय.
चीन जसा दबाव टाकतोय, तसाच व्हिएतनाम भारतासोबत बैठक करुन त्याला उत्तर देतोय. मात्र सध्या चीनच्या डोक्यात दबावतंत्राऐवजी युद्धाचं भूत घर करुन बसलं आहे.