जानेवारी 5 ला भारतामध्ये लॉन्च होणार Mi 10i, धमाकेदार आहेत फीचर्स
शाओमीने Mi 10i मध्ये 108 मेगापिक्सलचा प्रायमरी रिअर कॅमेरा दिला आहे. त्यामुळे हा फोन गॅजेट्स प्रेमींच्या पसंतीस उतरणार आहे.
मुंबई : चीनी स्मार्टफोन मेकर कंपनी शाओमीने Mi 10i लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. शाओमी इंडिया हेड मनू कुमार जैन यांनी स्वतः एक व्हिडिओ शेअर करत Mi 10i जानेवारी 5 ला भारतामध्ये लॉन्च होणार असल्याचं सांगितलं आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, शाओमीने Mi 10i मध्ये 108 मेगापिक्सलचा प्रायमरी रिअर कॅमेरा दिला आहे. त्यामुळे हा फोन गॅजेट्स प्रेमींच्या पसंतीस उतरणार आहे. (xiaomi launch mi 10i with 108mp camera on january 5)
मनू कुमार जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, Mi 10i कंपनीची दुसरी फ्लॅगशिप स्मार्टफोन्स Mi 10, Mi 10T आणि Mi 10T Pro चं एक्स्टेंशन असणार आहे. Mi 10 Lite अद्याप भारतामध्ये लॉन्च झालेलं नाही. शाओमीने दिलेल्या माहितीनुसार, Mi 10 मध्ये लावण्यात आलेला i म्हणजे इंडिया. कंपनीच्या सर्वेक्षणात दिलेल्या माहितीनुसार, हा फोन सगळ्या भारतीयांसाठी बनवण्यात आला आहे.
खरंतर, Mi 10i ला रेडमी नोट 9 प्रो 5 जीचा ट्वीक्ड व्हेरिएंट असल्याचंही सांगितलं जात आहे. जो हल्लीच चीनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. पण, Mi 10i मध्ये अनेक वेळा मोठे बदलही झाले होते. या फोनच्या कॅमेऱ्यामध्ये मोठा बदल करण्यात आला होता. स्मार्टफोनमध्ये 108 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला होता. या फोनमध्ये 8 जीबी रॅम असून संपूर्ण फ्लॅगशिप प्रोसेसरच्या जागी मिड रेंज प्रोसेसर असणार आहे.
Mi 10i भारतामध्ये दोन स्टोरेज व्हेरिएंटसह लॉन्च करण्याची शक्यता आहे. शाओमीने दिलेल्या माहितीनुसार, Xiaomi Mi 10i ला ब्लू, ब्लॅक आणि ऑरेंज कलरमध्ये मार्केटमध्ये आणलं जाणार आहे. (xiaomi launch mi 10i with 108mp camera on january 5)
संबंधित बातम्या –
1 जानेवारीपासून Samsung, Apple, LG आणि Moto च्या ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp बंद होणार?
Jio ग्राहकांना नव्या वर्षात मोठं गिफ्ट, कोणत्याही नंबरवर लोकल कॉल्स होणार फ्री
iPhone 12 Series सह अॅपलच्या इतर आयफोन आणि प्रोडक्ट्सवर मोठी सूट
(xiaomi launch mi 10i with 108mp camera on january 5)