PHOTO | यास चक्रीवादळाचा कहर सुरू, कुठे पडली झाडे आणि विजेचे खांब, कुठे लोखंडी साखळ्यांनी बांधल्या ट्रेन
या चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता पश्चिम बंगाल आणि ओडिसाच्या किनारपट्टी भागातून लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याचबरोबर मंगळवारी संध्याकाळी जोरदार वाऱ्यांमुळे उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील नैहाती आणि हलिहारमध्ये अनेक घरांचे नुकसान झाले. (Yas cyclone started wreak havoc, tree collapse, polls collapse, house loss)
Follow us
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी संध्याकाळी जोरदार वाऱ्यामुळे उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील नैहाती आणि हलिहारमध्ये अनेक घरांचे नुकसान झाले.
वाऱ्यामुळे वीजेच्या खांबांचे नुकसान झाले आणि झाडे उन्मळून पडली.
कोलकाता येथे यास चक्रीवादळ येण्यापूर्वी खबरदारी म्हणून सर्व होर्डिंग्ज काढून टाकण्यात आले.
अगरतळा येथे यास चक्रीवादळाचे आगमन होण्यापूर्वी रॉयल पॅलेस येथे काळे ढग जमले होते.
कोलकाता येथे यास चक्रीवादळाच्या आगमनापूर्वी सीलदह रेल्वे स्थानक यार्डात रेल्वेचे डबे साखळीच्या सहाय्याने रुळाला बांधण्यात आले.
हावडाच्या शालीमार स्थानकात चक्रीवादळ यासच्या तयारीचा भाग म्हणून रेल्वे कर्मचार्याने साखळ्यांचा उपयोग ट्रॅकला ट्रेन बांधल्या.
नुकताच, भूविज्ञान मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या अहवालनुसार, उत्तर हिंद महासागरातील चक्रीवादळांची वार्षिक वारंवारता 20 व्या शतकाच्या मध्यापर्यंत म्हणजे 1951 ते 2018 पर्यंत कमी झाली होती. मात्र, गेल्या दोन दशकांत, मान्सूननंतर अत्यंत तीव्र चक्रीवादळांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे.