‘एका महिलेच्या मागे आता अख्खा भाजप लागेल’, यशोमती ठाकूर यांचा भाजपवर हल्लाबोल

पोलिस कॉन्स्टेबलवर हात उगारल्याप्रकरणी यशोमती ठाकूर यांना शिक्षा, ठाकूर यांचा भाजप नेत्यांवर हल्लाबोल

'एका महिलेच्या मागे आता अख्खा भाजप लागेल', यशोमती ठाकूर यांचा भाजपवर हल्लाबोल
Follow us
| Updated on: Oct 15, 2020 | 7:07 PM

अमरावती: पोलिस कॉन्सेटबलवर हात उगारल्याप्रकरणी महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांना ३ महिन्यांची शिक्षा ठोठावण्यात आलीय. अमरावती जिल्हा न्यायालयाच्या या निर्णयानंतर आता भाजप नेत्यांनी यशोमती ठाकूर यांना टार्गेट करण्यास सुरुवात केलीय. त्यावर एका महिलेच्या मागे आता अख्खा भाजप लागेल, अशा शब्दात ठाकूर यांनी भाजपवर हल्ला चढवला आहे. आपलं राजकीय आयुष्य संपवण्याचे भाजपचे प्रयत्न आहेत. पण आपण माघार घेणार नाही. भाजपशी आपला लढा सुरुच राहील, असा निर्धार ठाकूर यांनी व्यक्त केला. (Minister Yashomati thakur on court decision)

अमरावती जिल्ह्या न्यायालयानं शिक्षा सुनावल्यानंतर यशोमती ठाकूर यांनी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं म्हटलंय. ‘मी स्वत: वकील आहे. त्यामुळं आपण सदैव न्यायालयीन प्रक्रियेचा आदर केला आहे. शेवटी विजय सत्याचाच होईल’, असं यशोमती ठाकूर म्हणाल्या.

काय आहे प्रकरण?

यशोमती ठाकूर यांनी अमरावतीत अंबादेवी मंदिराजवळ पोलिसाशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना 24 मार्च 2012 रोजी घडली होती. पोलीस कॉन्स्टेबल उल्हास रौराळे यांच्याशी हुज्जत आणि मारण्याचा प्रयत्न करणे, शासकीय कामात अडथळा आणणे या प्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली आहे.

आरोप सिद्ध झाल्याने यशोमती ठाकूर यांना तीन महिन्यांची शिक्षा आणि 15 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. त्यांचा कार चालक आणि सोबतचे दोन कार्यकर्ते देखील दोषी आढळले आहेत. फितुर होऊन साक्ष देणारा एक पोलिसही शिक्षेस पात्र ठरला आहे.

संबंधित बातम्या:

पोलिसावर हात उगारणे अंगलट, महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांना तीन महिन्यांची शिक्षा

महिलांकरिता विशेष बससेवा उपलब्ध करावी, यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Minister Yashomati thakur on court decision

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.