रात्री साडेबारा वाजता दार ठोठावलं म्हणून तरुणाची दगडाने ठेचून हत्या, डोंबिवलीतील धक्कादायक घटना

दार ठोठवल्याच्या रागातून एका 31 वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत घडली आहे (Youth murder due to knocking on door).

रात्री साडेबारा वाजता दार ठोठावलं म्हणून तरुणाची दगडाने ठेचून हत्या, डोंबिवलीतील धक्कादायक घटना
Follow us
| Updated on: Nov 15, 2020 | 7:55 PM

ठाणे : दार ठोठवल्याच्या रागातून एका 31 वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत घडली आहे. ही घटना नेमकं दिवाळीच्या दिवशी घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी दीपक मोरे या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत (Youth murder due to knocking on door).

डोंबिवली पूर्वेतील ज्योतीनगर परिसरात राहणाऱ्या दीपक मोरे आणि संजय गवळी या दोघांमध्ये शनविरी (14 नोव्हेंबर) रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास वाद झाला. वादाचे कारण केवळ इतकेच होते की, संजय गवळी याने रात्री साडेबारा वाजता दीपक मोरे याचे दार ठोठावले होते (Youth murder due to knocking on door).

संजय गवळीच्या दार ठोठावल्याचा दीपक याला इतका राग आला की, तो घराबाहेर आला. त्याने दगडाने ठेचून संजय गवळी याला गंभीर जखमी केले. घटनेत संजय याचा दुदैवी मृत्यू झाला. या प्रकरणी डोंबिवली रामनगर पोलिसांनी आरोपी दीपक मोरे याला अटक केली आहे.

“आरोपी दीपक मोरे याच्या पहिल्या पत्नीसोबत मयत संजय गवळीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशय त्याला होता. यावरुन दोघांमध्ये वाद झाले होते. शनिवारी रात्री संजय याने दीपकचे दार ठोठावले. यानंतर ही घटना घडली. पुढील तपास सुरु आहे. मयत संजय याच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत”, अशी माहिती रामनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सचीन सांडभोर यांनी दिली.

हेही वाचा :

लिव्ह इनमध्ये राहात असलेल्या प्रियकराचा अ‍ॅसिड हल्ला, प्रेयसीचा दुर्दैवी मृत्यू

कल्याणमध्ये दोन गटांत हाणामारीदरम्यान अ‍ॅसिड हल्ला, सहाजण गंभीर जखमी

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.