बोलता येत नाही, समस्या कशी मांडणार? तरुणाचा जयंत पाटलांसमोरच पत्नीला व्हिडीओ कॉल
पालकमंत्री जयंत पाटील (Minister Jayant Patil) यांच्याकडे आपल्या समस्येचं हमखास निवारण होईल, या अपेक्षेने एक तरुण त्यांना भेटण्यासाठी गेला. मात्र, त्याला बोलता येत नाही.
सांगली : पालकमंत्री जयंत पाटील (Minister Jayant Patil) यांच्याकडे आपल्या समस्येचं हमखास निवारण होईल, या अपेक्षेने एक तरुण त्यांना भेटण्यासाठी गेला. मात्र, त्याला बोलता येत नाही. त्यामुळे जयंत पाटील यांच्यासमोर गेल्यावर त्याला आपली समस्या मांडता येत नव्हती. मग त्याने शक्कल लढवत जयंत पाटील यांच्या समोरच आपल्या पत्नीला व्हिडीओ कॉल केला. जयंत पाटील (Minister Jayant Patil) यांनीही आपल्या हजरजबाबीवृत्तीने समस्या जाणून घेतली आणि प्रशासनाला समस्येचं निवारण करण्यासाठी तात्काळ आदेश दिले.
हेही वाचा – दादा प्रेमळ, पण रागीट वाटतात, ते उपमुख्यमंत्री पण मुख्यमंत्रीच वाटतात : चंद्रकांत पाटील
या तरुणाचं नाव हसन हकीम असं आहे. तो इस्लामपूर येथील रेठरे हरणाक्ष गावचा रहिवासी आहे. काही महिन्यांपूर्वी सांगली आणि कोल्हापुरात अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीत हसन हकीमचं घरदार उद्धवस्त झालं होतं. या कुटुंबाला राज्य सरकारची 95 हजार रुपयांची मदत मिळाली, मात्र केंद्राकडून येणारी मदत अद्यापही प्रलंबित आहे. ही मदत मिळावी यासाठी हसन जयंत पाटील यांच्याकडे गेला.
जयंत पाटील यांच्यासमोर गेल्यावर हसनला आपली समस्या मांडाताच येईना. कारण त्याला बोलता येत नाही. मग हसनने शक्कल लढवत जयंत पाटील यांच्या समोरच पत्नीला व्हिडीओ कॉल केला. मदत अपुरी मिळाल्याने हसन हकीमच्या पत्नीने थेट जयंत पाटील यांच्याकडे व्हिडीओ कॉलमार्फत दाद मागितली. जयंत पाटील यांनी या कुटुंबाचे प्रश्न समजून घेतले. त्यानंतर त्यांनी प्राशसकीय अधिकाऱ्यांना त्या कटुंबाच्या समस्यांचं तात्काळ निवारण करण्याचे आदेश दिले.
हेही वाचा – हर्षवर्धन जाधवांचा अटकपूर्व जामीन फेटाळला, कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता