AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

31 ऑक्टोबरला की 1 नोव्हेंबरला ? दिवाळी लक्ष्मी पूजनाचा मुहूर्त नेमका कधी ?

यंदा दिवाळीची तारीख आणि लक्ष्मी पूजनाचा मुहूर्ताबाबत बराच गोंधळ आहे. काहीजण 31 ऑक्टोबर तर काही जण 1 नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन आहे असे म्हणत आहेत. तर लक्ष्मीपूजनाचा नेमका मुहूर्त पाहूयात

31 ऑक्टोबरला की 1 नोव्हेंबरला ? दिवाळी लक्ष्मी पूजनाचा मुहूर्त नेमका कधी ?
Follow us
| Updated on: Oct 27, 2024 | 10:14 PM

दरवर्षी कार्तिक अमावस्येला दिवाळीचे लक्ष्मी पूजन केले  जाते. हिंदू धर्मातील हा सर्वात मोठा सण मानला जातो. दिवाळी हा सण प्रभु रामचंद्र 14 वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येला परत येतात याचा आनंद साजरा करण्याचा सोहळा म्हणून दिव्यांचा हा सण साजरा केला जात असतो. अयोध्या नगरी त्यावेळी दिव्यांनी आणि रांगोळ्यांनी सजली होती. त्या दिवसाची आठवण म्हणून दिवाळी सण साजरा करण्याची परंपरा चालत आली आहे. यंदा दिवाळीच्या तारखेवरुन कन्फ्युजन आहे. कोणी 31 ऑक्टोबर रोजी तर कोणी 1 नोव्हेंबर रोजी दिवाळीचे लक्ष्मी पूजन  असल्याचे म्हणत आहे. चला तर कन्फ्युजन दूर करुया नक्की दिवाळीचे लक्ष्मी पूजन केव्हा करायचे ते पाहूयात..

केव्हा साजरी होणार दिवाळी ?

यंदा दिवाळी 31ऑक्टोबर 2024 रोजी साजरी केली जाणार आहे. जयपूरचे केंद्रीय संस्कृत विद्यापीठातून अखिल भारतीय विद्वत परिषदद्वारा आयोजित धर्मसभेत सर्वसंमतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रतिष्ठीत विद्वानांच्या आणि ज्योतिषाचार्यांच्या आणि धार्मिक तज्ज्ञांच्या मतांच्या निर्णयाचा मान राखत ही तारीख जाहीर करण्यात आलेली आहे.

कार्तिक अमावस्या आणि लक्ष्मी पूजनसाठी 31 ऑक्टोबर या दिवसाला योग्य ठरवले आहे. 31 ऑक्टोबर या दिवशी दिवाळी साजरी करण्यावरुन कोणताही वाद नसल्याचे म्हटले जात आहे. सर्व महत्वाच्या व्यक्तींशी विचारविनिमय केल्यानंतर 31 ऑक्टोबरची निवड केली आहे.

1 नोव्हेंबर रोजी प्रदोष काळात केवळ काही मिनिटे अमावस्या तिथी राहणार आहे. त्यामुळे लक्ष्मी पूजनाला पुरेसा वेळ मिळणार नाही, तर 31 ऑक्टोबर रोजी प्रदोष काल आणि अर्धरात्री दोन्हीबाबतीत अमावस्या असल्याने धर्मशास्रानुसार याच तारखेला ( 31 ऑक्टोबर ) दीपावली साजरी करणे योग्य ठरेल असे सभा अध्यक्ष प्रा. रामपाल शर्मा यांनी म्हटले आहे.

31 ऑक्टोबर रोजी अमावस्येचा प्रवेश प्रदोष काळात होतो. आणि प्रदोष येताच दीपावली रात्र सुरु होते. वृष लग्न येतो. ब्रह्मपुराणानुसार राजा बळीच्या कारागृहातून मुक्त होऊ लक्ष्मी एकदम स्व‍च्छंद होऊन अर्ध्या रात्री प्रत्येकाच्या घरी जाते. अमावस्येच्या अर्ध्या रात्री ज्याचे घर खुले आहे, त्यांच्या घरी लक्ष्मी निवास करते. त्यामुळे सर्व विद्वानांच्या मतानुसार येत्या 31 ऑक्टोबर रोजी दिवाळी साजरी करणे योग्य होणार आहे असे केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे संचालक प्रा. सुदेश शर्मा यांनी म्हटले आहे.

1 नोव्हेंबर रोजी का नको पूजन ?

जर प्रदोष काळ 05.41 वाजल्यापासून 08.50 वाजल्यानंतर रात्री 24 मिनिट अमावस्या राहीली असती तर 1 नोव्हेंबर रोजी दीपावली साजरी करता आली असती. 1 नोव्हेंबर रोजी सुर्यास्तानंतर केवळ काही मिनिटे अमावस्येचा काळ असल्याने लक्ष्मी पूजन करणे शक्य नाही. त्यामुळे 31 ऑक्टोबर रोजी दीपावलीचे लक्ष्मी पूजन करणे योग्य असे पंडित कौशल दत्त शर्मा यांनी म्हटले आहे. देवी लक्ष्मीजी केवळ एक दिवसच अर्ध्यारात्री आपल्या कृपेचा वर्षाव करण्यासाठी आकाशभ्रमण करीत असते अशी मान्यता आहे.

दीपावली तिथि आणि मुहूर्त (Diwali 2024 shubh muhurt)

यावर्षी दीपावलीचा सण 31 ऑक्टोबर 2024 रोजी साजरा केला जाणार आहे. जयपूरच्या केंद्रीय संस्कृत विद्यापीठातील अखिल हिंदू पंचांग नुसार या वर्षी अमावस्या तिथी 31 ऑक्टोबर दुपारी 3.52 पासून 1 नोव्हेंबर सायंकाळी 6.16 मिनिटांपर्यंतच आहे.त्यामुळे 31 ऑक्टोबर रोजी रात्री दीपावलीचे लक्ष्मी पूजन करणे संयुक्तिक आहे.

दीपावलीचा पूजनाचा विधी (Diwali 2024 Puja Vidhi)

दिवाळीला पूर्व दिशा वा ईशान्य दिशेला एक चौकी ठेवावी, त्यावर लाल वा गुलाबी वस्र अंथरावे, आधी गणेशाची मूर्ती ठेवावी, त्यांच्या उजव्या लक्ष्मीजीला ठेवावे, आसनावर बसून चारी बाजूने पाणी शिंपडावे, त्यानंतर संकल्प करुन पूजा सुरु करावी. एक मुखी तुपाचे निरंजन प्रज्वलित करावे. मॉं लक्ष्मी आणि भगवान गणेशला फूले आणि मिठाई अर्पण करावीत. त्यानंतर आधी गणेश आणि नंतर मॉं लक्ष्मीचे स्तूती मंत्रांचा जप करावा, आरती करावी आणि शंखध्वनी करावा, घरात दीप ज्वलन करण्यापूर्वी ताटात पाच दिवे पेटवून फूलांना अर्पण करावे, त्यानंतर घराच्या विविध कोपऱ्यात दीपक ठेवावेत, मंदिरात ही दीपक प्रज्वलित करावेत. दीपावलीचे पूजन पिवळे किंवा चमकदार कपडे परिधान करुन करावे, काळा, तपकिरी किंवा निळा रंग परिधान करु नये.

भारत-पाक युद्धात मध्यस्थी केलीच नाही, मी फक्त... ट्रम्प यांचा यु-टर्न
भारत-पाक युद्धात मध्यस्थी केलीच नाही, मी फक्त... ट्रम्प यांचा यु-टर्न.
भारतीय विमानं 100 मैल आत घुसली...वॉशिंग्टन पोस्टनं पाकला तोंडावर पाडलं
भारतीय विमानं 100 मैल आत घुसली...वॉशिंग्टन पोस्टनं पाकला तोंडावर पाडलं.
पाकला मदत करतच राहणार... तुर्कीचा राष्ट्राध्यक्ष एर्दोगन पुन्हा बरळला
पाकला मदत करतच राहणार... तुर्कीचा राष्ट्राध्यक्ष एर्दोगन पुन्हा बरळला.
MIM सर्व निवडणुका लढवणार... BMC निवडणुकीबद्दल जलील यांचं मोठं वक्तव्य
MIM सर्व निवडणुका लढवणार... BMC निवडणुकीबद्दल जलील यांचं मोठं वक्तव्य.
दहशतवाद्याचा शेवटचा फोन, आई-बहिणीची तळमळ पण ऐकलं नाही अन्.. बघा VIDEO
दहशतवाद्याचा शेवटचा फोन, आई-बहिणीची तळमळ पण ऐकलं नाही अन्.. बघा VIDEO.
ट्रम्प भरकटलेत..ब्रिटीश लेखकाची चीन तुर्कीवर टीका,अमेरिकेला काय सल्ला?
ट्रम्प भरकटलेत..ब्रिटीश लेखकाची चीन तुर्कीवर टीका,अमेरिकेला काय सल्ला?.
दहशतवादी आमिर नझिर वाणीने मृत्यूपूर्वी बहिणीला केला होता व्हिडीओ कॉल
दहशतवादी आमिर नझिर वाणीने मृत्यूपूर्वी बहिणीला केला होता व्हिडीओ कॉल.
मान्सून अरबी समुद्रात दाखल, 27 मेपर्यंत केरळात धडकणर महाराष्ट्रात कधी?
मान्सून अरबी समुद्रात दाखल, 27 मेपर्यंत केरळात धडकणर महाराष्ट्रात कधी?.
तर मला आणि आंबेडकरांना सुद्धा एकत्र यावं लागेल, आठवलेंचं मोठं वक्तव्य
तर मला आणि आंबेडकरांना सुद्धा एकत्र यावं लागेल, आठवलेंचं मोठं वक्तव्य.
त्रालमध्ये 3 दहशतवादी ठार, जैश टॉप कमांडरचाही सहभाग, बघा ड्रोन दृश्य
त्रालमध्ये 3 दहशतवादी ठार, जैश टॉप कमांडरचाही सहभाग, बघा ड्रोन दृश्य.