तुम्ही गोव्याला जायचा प्लॅन करताय? तर मग ही बातमी आधी वाचा…

लोक 31 डिसेंबरला होणाऱ्या पार्टीसाठी लाँग टूर पॅकेजची बुकिंग करत आहेत. यावेळी गोवा देशभरातल्या पर्यटकांची पहिली पसंती ठरत आहे.

तुम्ही गोव्याला जायचा प्लॅन करताय? तर मग ही बातमी आधी वाचा…
Follow us
| Updated on: Dec 28, 2020 | 10:32 AM

मुंबई : कोरोनाच्या नव्या प्रजातीमुळे खबरदारीचा उपाय म्हणून पुन्हा एकदा मुंबईसह अन्य ठिकाणी ‘नाईट कर्फ्यू’ घोषित करण्यात आला आहे. यामुळे लोक 31 डिसेंबरला होणाऱ्या पार्टीसाठी लाँग टूर पॅकेजची बुकिंग करत आहेत. यावेळी गोवा देशभरातल्या पर्यटकांची पहिली पसंती ठरत आहे. अनेक राज्यांतून आतापर्यंत केलेल्या बुकींपैकी जवळपास 70 टक्के बुकिंग केवळ गोव्यासाठी आहे (40 thousand People choosing goa as a destination for new year eve).

या बुकिंगमध्ये फ्लाइट, ट्रेन, बस आणि मिनी बस बुकिंगचा समावेश आहे. गोव्यानंतर पर्यटकांची दुसरी पसंती माऊंट अबू, तर तिसरी पसंती शिमला आहे. वास्तविक, सगळ्याच पर्यटकांनी सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी अशी ठिकाणे निवडली आहेत, जेथे रात्री कर्फ्यू आणि कोरोना संबंधित फारसे निर्बंध नाहीत. आरोग्याची खबरदारी घेत यावेळी काही लोक त्यांच्या खासगी वाहनांतून फिरायला जाण्याला पसंती देत आहे.

दिवाळीतले नुकसान भरून निघणार!

ट्रॅव्हल्स एजन्सींचे असे म्हणणे आहे की, या वेळी कोरोनामुळे दीपावलीत झालेल्या नुकसानीपैकी काही नुकसान, वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या पार्टी आणि सहलींमधून वसूल केले जाईल. या सहलींच्या आयोजनामुळे आतापर्यंत 20 कोटींची उलाढाल झाली आहे. गोव्याला जाणाऱ्या जवळपास सर्वच गाड्याही पूर्णपणे भरल्या आहेत. साप्ताहिक गाड्यांचीही स्थितीही काहीशी अशीच आहे. गोव्यातील सर्व हॉटेल्ससुद्धा पूर्णपाने आरक्षित झाली आहेत. यावेळी रेल्वेनेही खबरदारी घेत पूर्ण तयारी केली आहे. 30 डिसेंबर आणि 1 जानेवारी रोजी मडगावपर्यंत रेल्वे काही विशेष गाड्या चालवणार आहे. त्याचे बुकिंग 28 डिसेंबरपासून सुरू होईल (40 thousand People choosing goa as a destination for new year eve).

बुकिंग अजूनही सुरूच!

सुरतमधील टूर अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करणाऱ्या लोकांनी सांगितले की, 31 डिसेंबर रोजी सुमारे 40 हजार लोक नववर्षाच्या स्वागतासाठी फिरायला जाण्याचे नियोजन करत आहेत. त्यापैकी 70 टक्के लोक केवळ गोव्यासाठी बुकिंग करत आहेत. त्यानंतर माऊंट अबू आणि शिमलासाठी बुकिंग आहेत. मात्र, याचवेळी पर्यटकांकडून दमण, दीव, सपुतारा, केवडिया कुरग आणि कच्छ या ठिकाणांचेही बुकिंग केले जात आहे.

फ्लेक्सी फेअरमध्येही वाढ!

27, 28, 29 आणि 30 डिसेंबर रोजी सूरत ते गोवा इंडिगोचे उड्डाण बुकिंग पूर्ण आरक्षित झाले आहे. केवळ सुरतच नाहीतर, इतर राज्य आणि शहरांमध्ये देखील हीच स्थिती आहे. विमानांच्या फ्लेक्सी फेअरनेही 7000चा टप्पा पार केला आहे.

(40 thousand People choosing goa as a destination for new year eve)

हेही वाचा :

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.