निरोगी राहण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ‘हे’ खास पेय दररोज प्या
कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या काळात हेल्दी आहार आणि व्यायाम करण्यावर भर दिला पाहिजे. सध्याच्या या काळात आपण रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढेल याकडे विशेष लक्ष दिले पाहिजेत.
मुंबई : कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या काळात हेल्दी आहार आणि व्यायाम करण्यावर भर दिला पाहिजे. सध्याच्या या काळात आपण रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढेल याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपण आहारात काही ज्यूस घेतले पाहिजेत. ज्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. हे नेमके कोणते ज्यूस आहेत. ज्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. हे आज आपण बघणार आहोत. (A special drink of apples, beets and carrots is beneficial for health)
सफरचंद, बीट आणि गाजराचे पेय
सफरचंद, बीट आणि गाजराचा ज्यूस आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. हा ज्यूस दररोज पिल्यामुळे यकृत, मूत्रपिंड, आतडे आणि त्वचेतून विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. हेल्दी आरोग्यासाठी हा खास ज्यूस खूप आवश्यक आणि फायदेशीर आहे. आपण हा ज्यूस दररोज सकाळी रिकाम्या पोटी पिला पाहिजे.
बीट
बीट आपल्या आरोग्यासाठी अनेक मार्गांनी एक महत्वाची भूमिका बजावते. आजकाल बीट संपूर्ण वर्षभर बाजारात उपलब्ध असते. बीट हा लोह, जीवनसत्व, फॉलिक अॅसिड आणि खनिजांचा चांगला स्त्रोत आहे. बीट शरीरातील हिमोग्लोबिन वाढवतात आणि रक्त शुद्ध करतात. विशेष म्हणजे बीट खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
सफरचंद
सफरचंद खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. सफरचंदमध्ये कँलरी कमी असून विटामिन सी, मिनिरल्सबरोबर फायबरची मात्रा जास्त प्रमाणात असते. त्यामुळेही वजन कमी होण्यास मदत होते. सध्याच्या कोरोना काळात तर दररोज सफरचंदचा आहारात समावेश केला पाहिजे.
गाजर
गाजरात व्हिटॅमिन ए, बी, सी, डी, ई, जी असतात. त्यामुळे गाजर खाणे शरीरासाठी फायद्याचे आहे. यामुळे अनेक आजारांवर मात करता येते. गाजर खाल्ल्याने हाडे निरोगी राहण्यापासून ते डोळ्यांचा कमकुवतपणा देखील दूर होतो. गाजरात 95 टक्के पाण्याचे प्रमाण असते. ज्यामुळे गाजर खाण्यामुळे तुम्ही हायड्रेट राहता.
सफरचंद, बीट आणि गाजराचे पेय तयार करण्यासाठी
-1 बीट
-1 सफरचंद
-1 गाजर
-5-10 पुदीना पाने
-1 लिटर पाणी
पध्दत – बीट, सफरचंद आणि गाजर स्वच्छ धुवून सोलून घ्या. हे सर्व बारीक करून घ्या आणि 1 लिटर पाण्यात मिक्स करा. रात्रभर हे पाण्यातच ठेवा. त्यानंतर दिवसभर हे पाणी प्या.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Lipstick shades | तुमच्या चेहऱ्यासाठी लिपस्टिकचा कोणता रंग ठरेल सर्वोत्तम? जाणून घ्या…
आकर्षक वनस्पतींनी खुलवा घरांची सजावट, जाणून घ्या कशी करायची देखभाल?
किवी आरोग्यासाठी जबरदस्त फायदेशीर, वाचा फायदे https://t.co/cUqNVdKB2R #Kiwi | #HealthCare | #healthtips
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 25, 2021
(A special drink of apples, beets and carrots is beneficial for health)