वास्तूशास्त्रानुसार बाथरुममध्ये कधीच ठेवू नयेत या 3 गोष्टी, अन्यथा येऊ शकते गरिबी

जर तुमच्या घरात वास्तू दोष असेल तर त्याचा थेट परिणाम तुमच्या जीवनावर होतो. वास्तूशास्त्रात अनेक वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत. कोणती वस्तू कुठे असावी याचा उल्लेख केला आहे. बाथरुममध्ये देखील कोणत्या गोष्टी ठेवू नयेत ज्यामुळे गरिबीचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो.

वास्तूशास्त्रानुसार बाथरुममध्ये कधीच ठेवू नयेत या 3 गोष्टी, अन्यथा येऊ शकते गरिबी
Follow us
| Updated on: Jun 17, 2024 | 6:42 PM

वास्तुशास्त्रावर अनेकांचा खूप विश्वास आहे. वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही कोणत्या गोष्टी केल्या तर त्याचा तुम्हाला चांगला परिणाम दिसतो. वास्तूशास्त्रात शुभ आणि सकारात्मक परिणाम हवे असतील तर काही गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. कधी कधी वास्तूशास्त्राच्या विरुद्ध जाऊन आपण एखादी गोष्ट करतो तेव्हा त्याचे परिणाम देखील खूप नकारात्मक असतात. असे मानले जाते. वास्तुशास्त्रात प्रत्येक प्रकारची समस्या आणि त्याचे उपाय सांगितले आहेत. त्यामुळे जर वास्तूसास्त्रानुसार तुम्ही प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक करत असाल तर घरातील वास्तुदोष दूर होऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला आणखी एक अशी गोष्ट सांगणार आहोत. वास्तुशास्त्रानुसार कोणत्या गोष्टी चुकूनही तुमच्या बाथरूममध्ये ठेवू नयेत. ज्यामुळे तुमची आर्थिक प्रगती थांबू शकतो.

रिकामी बादली

प्रत्येक बाथरूममध्ये दिसणारी पहिली गोष्ट म्हणजे पाण्याची बादली. पण तुम्हाला माहीत आहे का की बाथरूममध्ये चुकूनही रिकामी किंवा तुटलेली बादली ठेवू नये. जर तुम्ही ती ठेवत असाल तर याचा तुमच्या आर्थिक गोष्टींवर परिणाम होऊ शकतो. बाथरूममध्ये नेहमी भरलेली बादली ठेवली पाहिजे. बाथरूममध्ये रिकामी बादली ठेवल्याने धनहानी होऊ शकते. जर बादली रिकामी असेल तर बाथरूममधून बाहेर काढून ठेवा. हा एक चांगला पर्याय असू शकतो.

तुटलेली काच

बाथरूममध्ये अनेक लोकं आरसा लावतात. आरसा लावण्यात काही गैर नाही. पण जर तो आरसा फुटलेला असेल तर तो लगेचच काढून टाकावा. असे केल्यान घरात वास्तूदोष निर्माण होतो. यामुळे तुमची आर्थिक कोंडी देखील होऊ शकते. वास्तूशास्त्रानुसार तुटलेला आरसा ह नकारात्मक उर्जा देतो. तो नकारात्मकतेचं प्रतीक मानला जातो. त्यामुळे जर तुटलेली काच घरात ठेवत असाल तर त्यामुळे गरिबी तुमच्याकडे आकर्षित होते.

तुटलेली चप्पल

तुमच्या बाथरूममध्ये तुम्ही कधीही तुटलेली चप्पल ठेवू नका. असे केल्याने देखील आर्थिक हानी होते. बाथरुममध्ये जर तुटलेले चप्पल ठेवत असाल तर तुम्हाला नकारात्मक ऊर्जेचा सामना करावा लागू शकतो. ज्योतिष शास्त्रानुसार तुटलेल्या चप्पलमुळे तुमच्या घरातील ग्रह अशुभ राहतात.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.