ग्रीन टीमध्ये मिसळा ‘हे’ आयुर्वेदिक घटक, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात ठरतील फायदेशीर!
‘ग्रीन टी’चा ट्रेंड प्रचंड वेगाने वाढत आहे. ‘ग्रीन टी’ त्याच्या अँटी ऑक्सिडंट गुणधर्मांमुळे मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय कुटुंबांचे आवडते पेय बनले आहे.
मुंबई : ‘ग्रीन टी’चा ट्रेंड प्रचंड वेगाने वाढत आहे. ‘ग्रीन टी’ त्याच्या अँटी ऑक्सिडंट गुणधर्मांमुळे मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय कुटुंबांचे आवडते पेय बनले आहे. वजन वाढल्यानंतर आपल्याला अनेकांकडून ग्रीन टी पिण्याचा सल्ला दिला जातो. ग्रीन टी मध्ये न्यूट्रिशन आणि अँटीऑक्सिडेंट घटक असतात. सध्या वाढलेल्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये ग्रीन टीमध्ये तुळस, दालचिनी, काळी मिरी, सुंठ, आलं टाकून पिणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे आणि यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
-जेव्हा ग्रीन टीमध्ये आले मिसळले जाते, तेव्हा तिचे आरोग्यादायी फायदे आणखी वाढतात. वाढत्या रोगप्रतिकारशक्तीबरोबरच आले कर्करोग रोखण्यासही मदत करते. हा चहा दमा, मधुमेह आणि मासिक पाळीच्या वेदनांपासून मुक्त होण्यासाठी देखील वापरला जातो.
काळ्यामिरीत हे औषधी गुणांनी परिपूर्ण आहे. यात लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम, मॅंगनीज, जस्त, क्रोमियम, व्हिटामिन ए आणि इतर पोषक गुणधर्म आढळतात. याशिवाय यामध्ये रायबोफ्लेविन, थायामिन, पोटॅशियम, सोडियम, फॉलेट, बेटेन आणि नियासिन हे घटकदेखील आढळतात. ग्रीन टीमध्ये काळ्यामिरी टाकून पिले पाहिजे.
-ग्रीन टीमध्ये तुळशीची पाने टाकल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढते, पचनक्रिया सुधारते आणि आपली भूक देखील कमी होते. यासारखे आरोग्यविषयक अनेक फायदे मिळतात. तसेच, दालचिनी देखील वजन कमी करण्यास मदत करते.
-सुंठ ग्रीन टीमध्ये टाकल्यावर सर्दी, ताप आणि खोकल्या सारख्या अनेक समस्या दूर होतात. यामुळे जेंव्हा सर्दी, ताप आणि खोकल्या येतो त्यावेळी ग्रीन टीमध्ये सुंठ टाकावी. आलं ग्रीन टीमध्ये टाकून पिण्याचे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात.
-लिंबाचा रस ग्रीन टीच्या कडू चवीचा प्रतिकार करतो. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, लिंबूवर्गीय फळामचा रस ग्रीन-टीमध्ये मिसळल्यास त्यातील अँटीऑक्सिडेंट्स वाढतात, जे आपल्या शरीरासाठी अधिक फायदेशीर आहेत. परंतु, आपल्या ग्रीन-टीला आधी थंड होऊ द्या आणि नंतरच त्यात थोडे लिंबू पिळून मग त्याचे सेवन करा.