चहामध्ये लवंग घाला आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवा, वाचा !
बहुतेक लोक आपल्या दिवसाची सुरुवात चहाच्या एका ‘फ्रेश’ घोटाने करतात. चहा हे पेय आपल्याला दिवसभराची ऊर्जा देते आणि उत्साही बनवते.
मुंबई : बहुतेक लोक आपल्या दिवसाची सुरुवात चहाच्या एका ‘फ्रेश’ घोटाने करतात. चहा हे पेय आपल्याला दिवसभराची ऊर्जा देते आणि उत्साही बनवते. बरेच लोक दिवसभरात 8 ते 10 कप चहा पितात. बर्याच लोकांना बेडवरुण उठल्या उठल्या चहा पिण्याची अर्थात बेड टीची सवय देखील असते. मात्र, सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण चहामध्ये चार ते पाच लवंग घातल्या पाहिजेत. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. (Add cloves to tea and boost the immunity)
-हा मसालेदार चहा आपल्या पचनसाठी फायदेशीर आहे. त्यात असलेल्या लवंगा आणि इतर गोष्टी पचन क्रिया सुधारतात. हा चहा दररोज प्यायल्याने वजन कमी होते. मसाले आपला चयापचय दर वाढवण्यासाठी काम करतात, ज्यामुळे चरबी जलदगतीने कमी करण्यात मदत होते.
-लवंगाचे सेवन केल्याने भूक वाढते, उलट्या थांबतात, पोटात गॅस तयार होत नाही, जास्त तहान लागणे आणि कफ-पित्तदोष देखील दूर होतात. याव्यतिरिक्त, रक्त विकार, श्वसन रोग, उचकी आणि क्षयरोगातही लवंगा वापरल्याने आपल्याला फायदा होऊ शकतो.
-तीव्र डोकेदुखी झाल्यास लवंगामध्ये चवीनुसार मीठ मिसळून, त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट दुधासह सेवन करा. याचे सेवन केल्यास डोकेदुखीपासून लवकरच आराम मिळतो. तांब्याच्या भांड्यात लवंगांची बारीक पूड करा. त्यामध्ये मध मिसळून डोळ्यात लावल्याने डोळ्यांच्या आजारांमध्ये आराम मिळतो. हे आपल्या डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे.
-मसालेदार चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. परंतु, जास्त प्रमाणात त्याचे सेवन केल्याने आपले नुकसान देखील होऊ शकते. दिवसातून 1 ते 2 वेळाच लवंगयुक्त चहा प्या. जास्त चहा घेतल्यामुळे स्नायू वेदना, पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. गर्भवती आणि स्तनपान देणाऱ्या महिलांनी लवंगाचे जास्त सेवन करू नये. जास्त मसाले खाणे आपल्या बाळासाठी हानिकारक आहे. हा चहा प्यायल्यानंतर आपल्याला उलटी झाल्यासारखे वाटत असेल, तर तो पिऊ नका.
(टीप : सेवनापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!
Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो
Hair Care | थंडीच्या दिवसांत रुक्ष केसांच्या समस्येमुळे हैराण? मग ‘हे’ हेअर मास्क नक्की ट्राय करा!https://t.co/R06JFAcxU4#HairMask #HairCare #beautytips
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 29, 2020
(Add cloves to tea and boost the immunity)