Summer Food | उन्हाळ्याच्या दिवसांत आहारात आवर्जून सामील करा ‘हे’ घटक, आजारांपासून राहाल दूर!

हवामानातील बदलांमुळे आपल्या जीवनशैलीत आणि अन्नामध्येही बदल करावा लागतो.

Summer Food | उन्हाळ्याच्या दिवसांत आहारात आवर्जून सामील करा ‘हे’ घटक, आजारांपासून राहाल दूर!
Follow us
| Updated on: Mar 07, 2021 | 8:11 AM

मुंबई : हवामानातील बदलांमुळे आपल्या जीवनशैलीत आणि अन्नामध्येही बदल करावा लागतो. आता हिवाळ्याचा हंगाम संपला आणि उन्हाळ्याने लवकरच येण्याच्या वाटेवर आहे. यामुळे आपले खाणेपिणेही ऋतूनुसार बदलले पाहिजे. आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींचा आरोग्यावर देखील मोठा परिणाम होतो आणि थोडासाही निष्काळजीपणा आपल्याला या दिवसांत आजारी बनवू शकतो. (Add these foods in your summer diet will keep you healthy).

उन्हाळ्याच्या हंगामात, तळलेल्या आणि मासालेदार पदार्थांपासून थोडेसे दूर राहावे. जास्तीत जास्त पाणी प्यावे. उन्हाळ्यात पाण्याअभावी निर्जलीकरण होऊ शकते. म्हणून या हंगामात रस, फळ, नारळ पाण्याचे सेवन केले पाहिजे. या व्यतिरिक्त अन्नामध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे असणारे घटक सामील करावेत. चला तर, जाणून घेऊया या हंगामात आपण कोणत्या गोष्टींचे सेवन केल्याने शरीर इतर रोगांपासून दूर राहील…

टोमॅटो टोमॅटो आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हा घटक अँटी-ऑक्सिडेंट्स आणि व्हितामिन सीने समृध्द आहे. टोमॅटोमध्ये लायकोपीन सारखे फायटोकेमिकल्स असतात, ज्यामुळे गंभीर आजार बरे होण्यास मदत होते.

दही उन्हाळ्यात दही खाणे केव्हाही चांगले. हे खाल्ल्याने तुम्हाला आतून थंडावा वाटतो. यात प्रोबायोटिक्स असतात, जे पाचन प्रणाली मजबूत करण्यास मदत करतात. दह्यामध्ये भरपूर प्रोटीन असते, ज्यामुळे दही खाल्ल्यानंतर आपल्याला बराच वेळ भूक लागणार नाही. भूक न लागल्यामुळे आपण अनहेल्दी पदार्थ खाणे टाळू शकू.

संत्री संत्र्यामध्ये व्हिटामिन सी भरपूर प्रमाणात असते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, उन्हाळ्यात शरीरातून निघणाऱ्या घामाद्वारे पोटॅशियम बाहेर सोडले जाते, ज्यामुळे शरीरात कमजोरी होण्याची समस्या वाढते. म्हणून या हंगामात संत्रे खाणे फायद्याचे आहे. संत्र्यामध्ये 80 टक्के रस असतो, जो शरीराला हायड्रेटेड ठेवतो.

ग्रीन टी उन्हाळ्यात आपण कॉफीऐवजी हर्बल चहा पिऊ शकता. ग्रीन टी आपल्या शरीराला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते. जर आपल्याला या हंगामात गरम ग्रीन टी पिणे आवडत नसेल, तर आपण तो थंड करून पिऊ शकतो. हे पेय पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे (Add these foods in your summer diet will keep you healthy).

ब्लॅकबेरी आणि रास्पबेरी बेरी फायबरचा चांगला स्रोत आहेत. आपल्याला बद्धकोष्ठतेची समस्या असल्यास ब्लॅकबेरीचे सेवन करावे. त्यात व्हिटामिन सी समृद्ध प्रमाणात आढळतो.

सलाड उन्हाळ्याच्या काळात आहारात सलाडचा समावेश आवर्जून करावा. सलाडमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे समृद्ध प्रमाणात असतात. सलाडमध्ये आपण गाजर, टोमॅटो, द्राक्षे, काकडी इत्यादी वापरू शकता.

कलिंगड कलिंगड शरीर थंड ठेवण्यास मदत करतो. कलिंगडामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आहे. यात लायकोपीन असते, जे त्वचेला सूर्यापासून होणाऱ्या नुकसानापासून वाचवते.

संबंधित बातम्या : 

(Add these foods in your summer diet will keep you healthy)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.