lipstick | लिपस्टिक लावल्यानंतर तुमची ओटं फुटतात; जाणून घ्या सोप्या टिप्स
आजकाल लिपस्टिक लावणे महिलांच्या फॅशनची पहिली स्टेप झाली आहे. स्वतःला परफेक्ट लूक देण्यासाठी महिला वेगवेगळ्या रंगांच्या लिपस्टिक लावतात.
हिवाळ्यात ओटं फुटतात. महिलांसोबत बरेचदा असेलही होती की, ऋतुत बदल झाल्यानंतर ओटं कोरडे होतात. आजकाल बहुतेक महिला लिपस्टिक लावणे पसंत करतात. अशावेळी लिपस्टिक लावल्यानंतर ओट फुटण्याची समस्या (chapped lips after lipstick) समोर येते. खराब लिपस्टिक किंवा लिप केअरचा वापर केल्यामुळं बरेचदा असं होतं.
याशिवाय कित्तेक वेळा मेट लिपस्टिक लावल्यामुळं असं होते. कधीकधी ओटांच्या भेगा खूप त्रासदायक ठरतात. ओटांमधून रक्तही बाहेर निघते. अशावेळी ओट सामान्य होण्यासाठी बराच वेळ लागतो. ओट दुरुस्त झाल्यानंतरच तुम्ही लिपस्टिक लावू शकता. आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. या टिप्समधून लिपस्टिकमुळं ओटं फुटणं बंद होईल.
लिपस्टिकची गुणवत्ता तपासली पाहिजे
लिपस्टिकची गुणवत्ता कशी आहे आणि त्याठिकाणी कोणत्या वस्तू मिसळल्या गेल्या आहेत. ही माहिती करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक लिपस्टिकमध्ये मोम, तेल, पिग्मेंट्स मिसळविले जाते. परंतु, हे तत्व मॅट लिपस्टिक किंवा ग्लोसी लिपस्टिक बनविण्यासाठी बदलविण्यात येतात. मॅट लिपस्टिकमध्ये जास्त मोम, रंग आणि कमी तेलाचा वापर केला जातो. त्यामुळं ती जास्त वेळ टिकते. कमी तेल असल्यास ओट कोरडे होतात. म्हणून लिपस्टिक खरेदी करताना याची काळजी घेतली पाहिजे.
लिपस्टिक लावण्यापूर्वी लिप बाम लावा
जेव्हा लिपस्टिक लावता त्याच्या आधी लिप बाम अवश्य लावावा. लिप बाम लावल्यानं ओटांची त्वचा मॉइस्चराइज राहते. लिपस्टिकचा वापर केल्यानंतर ओटं फुटत नाही आणि चमकही राहते.
ओलावा टिकवून ठेवावा
ओटांच्या त्वचेची सगळ्यात जास्त काळजी घेतली पाहिजे. ओटांचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी ओटांचा ओलावा टिकवून ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. याशिवाय ओटांना खोबरेल तेल लावता येईल. परंतु, केमिकलवाल्या लिप बामपासून नेहमी सावध राहिले पाहिजे.
लिप लायनरचा वापर करावा
मॅट लिपस्टिक लावण्यापूर्वी आपल्या ओटांसाठी लिप लायनरचा वापर करावा. लायनर लावल्यानं लिपस्टिक जमा होण्याची शक्यता जास्त असते. लिपलायनर मॅट लिपस्टिकला तोंडाजवळ जमण्यापासून थांबवा. शिवाय याच्या वापराने लिपस्टिक जास्त वेळापर्यंत टिकून राहते.
येवढेच नाही, तर रोज लिपस्टिक लावू नका. यामुळं तुमच्या ओटांची त्वचा खराब होऊ शकते. रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या लिपस्टिक लावलेल्या ओटांची त्वचा खराब होऊ शकते. रात्री झोपण्यापूर्वी लिपस्टिकला पूर्ण साफ करून मॉइस्चराइज अवश्य करावे.