घरच्या घरी तयार करा आवळ्याचा फेसपॅक आणि मिळवा सुंदर त्वचा !
आवळा आपल्या आरोग्यासह आपल्या त्वचेसाठीही फायदेशीर आहे.
मुंबई : आवळा आपल्या आरोग्यासह आपल्या त्वचेसाठीही फायदेशीर आहे. यात व्हिटामिन बी 5, व्हिटामिन बी 6, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम समृद्ध प्रमाणात आढळते. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटी ऑक्सिडेंट असतात, ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.(Amla face pack is beneficial for the face)
आवळा हे असे सुपर फूड आहे, जे अनेक रोगांपासून बचाव करण्यासाठी वापरले जाऊ शकते. यामुळे तुमची पचनशक्ती देखील बळकट होईल. तुम्ही आवळा कच्चा, पावडर, लोणचे आणि रस या स्वरूपात खाऊ शकता. आज आम्ही तुम्हाला आवळ्याचा फेस पॅक सांगणार आहोत.
-आवळा,दही आणि मधाचा फेसमास्क आवळा आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. मध आणि दही यामुळे त्वचेचा पोत सुधारतो. त्याबरोबरच चेह-यावरील पिंपल्स कमी होऊन डाग देखील नाहीसे होतात. हा फेसमास्क तयार करण्यासाठी 2 चमचे आवळ्याची पावडर, 1 चमचा मध, 1 चमचा दही एकत्र करुन हा लेप 20 मिनीटे चेह-यावर ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.
-आवळा, लिंबू आणि मध यांचा फेसमास्क या मास्कमुळे चेह-याला थंडावा मिळतो. या लेपामुळे चेह-यावरील पुटकुळ्या कमी होतात. हा लेप तयार करण्यासाठी 2 चमचे आवळ्याचा रस, 2 चमचा लिंबाचा रस, 1 चमचा मध आणि त्यात आणखी २ चमचे आवळा पावडर एकत्र करुन हा लेप चेह-यावर लावा त्यानंतर 20 मिनीटांनी चेहरा स्वच्छ धुवावा.
-पपई आणि आवळ्याचा फेसमास्क पपईच्या गरामुळे चेहरा उजळतो. तसेच चेह-यावरील मृत त्वचा निघून जाण्यासही मदत होते. यासाठी 2 चमचे आवळा पावडर आणि पपईचे बारीक तुकडे एकत्र करुन हा मास्क 15 मिनीटे चेह-यावर लावा त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.
संबंधित बातम्या :
Skin Care Tips | लग्न करताय? ना ब्यूटी पार्लर, ना ट्रिटमेंट, ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा ग्लो!
Dark Circle Home Remedy | डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतायत? ‘या’ टिप्स नक्की वापरून पाहा…
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Amla face pack is beneficial for the face)