Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

झोप पूर्ण होऊनही अशक्त वाटतंय?, थकवाही येतोय?; जाणून घ्या नेमकं कारण!

कोरोनाच्या काळात प्रत्येकजण आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे.

झोप पूर्ण होऊनही अशक्त वाटतंय?, थकवाही येतोय?; जाणून घ्या नेमकं कारण!
झोप
Follow us
| Updated on: May 19, 2021 | 8:45 AM

मुंबई : कोरोनाच्या काळात प्रत्येकजण आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असेल तर आपण कोरोनापासून दूर राहू शकतो. यामुळे आज प्रत्येकजण रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यासाठी अनेकांनी आपल्या जीवनशैलीमध्ये देखील काही बदल केले आहेत. मात्र, आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आहे हे कसे समजणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. (Anemia is a symptom of a weakened immune system)

आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असल्यास सकाळी झोपीतून उठल्यानंतर आपल्याला अशक्तपणा आणि थकवा वाटत असेल तर आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असल्याचे हे पाहिले लक्षण आहे. बऱ्याच वेळा आपली झोप चार ते पाच तास होते. त्यावेळी अशक्तपणा आणि थकवा जाणवणे स्वाभाविक आहे. परंतू सात ते आठ तास झोप होऊन सुध्दा आपल्याला अशक्तपणा आणि थकवा जाणवत असेल तर आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आहे.

ज्यावेळेला पूर्ण झोप होऊन सुध्दा ही लक्षणे असतील तर आपण डाॅक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपण आहारातमध्ये काही पदार्थांचा समावेश केला पाहिजे. ज्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल. लाल शिमला मिर्चीत जीवनसत्त्वे सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के, फायबर आणि बीटा कॅरोटीन यामध्ये भरपूर प्रमाणात आढळतात. कॅप्सिकममध्ये कॅलरी असतात, त्यामुळे कोलेस्टेरॉल वाढत नाही.

व्हिटॅमिन सीचे सेवन रोगप्रतिकारशक्ती सुधारते. कोलेस्टेरॉलची पातळी कमी करून रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत होते. यामुळे आहारात जास्त-जास्त लाल शिमला मिर्चीचा समावेश करा. शिमला मिर्ची खाल्ल्याने वजन कमी होण्यास देखील मदत होते. प्रथिनेयुक्त बदाम आपले स्नायू तयार करण्यात मदत करतात. यासह बदाममध्ये आढळणारे फॅट चांगले आणि निरोगी असते, जे आपल्या शरीराचे बॉडी मास इंडेक्स म्हणजे बीएमआय राखण्यास मदत करते. विशेष म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी बदाम खाणे चांगले मानले जाते.

(टीप : कोणत्याही कृतीपूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.)

संबंधित बातम्या : 

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी बदाम, लाल शिमला मिर्ची आणि मासे फायदेशीर, वाचा !

चहा-कॉफी की बियर-वाईन, काय पिता तुम्ही… त्याचे फायदे-तोटे तुम्हाला माहिती आहे का?

(Anemia is a symptom of a weakened immune system)

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.