Body Ubtan On Narak Chaturdashi: नरक चतुर्दशीच्या दिवशी लावा हे उटणं, त्वचा होईल चमकदार

धनत्रयोदशी नंतर नरक चतुर्दशी साजरी करण्यात येते. या दिवशी छान तेल, उटणं लावून अभ्यंग स्नान करण्यात येतं.

Body Ubtan On Narak Chaturdashi: नरक चतुर्दशीच्या दिवशी लावा हे उटणं, त्वचा होईल चमकदार
Follow us
| Updated on: Oct 22, 2022 | 4:46 PM

दिवाळी (Diwali) हा दिव्यांचा आणि सजावटीचा सण आहे, जो पाच दिवसांपर्यंत साजरा केला जातो. वसुबारस पासून या सणाची सुरूवात होते. भाऊबीजेपर्यंत हा सण साजरा केला जातो. प्रत्येक दिवशी श्रद्धेने वेगवेळी पूजा (pooja) केली जाते. धनत्रयोदशीनंतर नरक चतुर्दशी साजरी केली जाते. या दिवशी लोक घरातील घाण आणि जुनी रद्दी साफ करतात. घराच्या स्वच्छतेसोबतच शरीराची स्वच्छताही केली जाते. या दिवशी छान तेल, उटणं (ubtan)लावून अभ्यंग स्नान करण्यात येतं.

नरक चतुर्दशीच्या दिवशी बरेच जण सुगंधित तेलाने मालिश करून छान उटणं लावून स्नान करतात. या उटण्यामुळे प्रत्येक व्यक्तीचा चेहरा सणाच्या दिवशी छान उजळून निघतो. शरीरावरील मळ स्वच्छ करणारे, त्वचेची चमक परत आणणारे उटणं वापरलं जातं. दिवाळीनिमित्त कोण-कोणतं उटणं वापरता येईल ते जाणून घेऊया.

बेसन व हळदीचे उटणे – चेहरा आणि शरीर सुंदर करण्यासाठी चण्याच्या पिठाचा म्हणजेच बेसनाचा वापर सर्वोत्तम मानला जातो. यंदा नरक चतुर्दशीच्या दिवशी चण्याच्या पिठाचा आणि हळदीच्या उटण्याचा वापर करून शरीर चमकदार बनवता येईल. हे उटणं तयार करण्यासाठी चण्याच्या पिठात एक चमचा साय आणि दही मिसळावे. त्यासोबतच त्यात चिमूटभर हळद घालावी. ह सर्व घटक चांगल्या प्रकारे मिक्स केल्यानंतर चेहऱ्यावर आणि शरीरावर लावा. बोटांनी मसाज करताना हे उटणं लावावं.. 15 मिनिटं ते शरीरावर राहू द्यावं. नंतर कोमट पाण्याने आंघोळ करावी. या उटण्याचा वापर केल्याने त्वचा चमकदार होईल.

हे सुद्धा वाचा

ओट्स व साय – आपली त्वचा एक्‍सफॉलिएट करण्यासाठी ओट्स आणि साय ( क्रीम) यांचा वापर केला जाऊ शकतो. ओट्स त्वचा स्वच्छ करण्यासाठी स्क्रबर म्हणून काम करते. हे उटणं बनवण्यासाठी अर्धा कप ओट्समध्ये दोन चमचे साय आणि गुलाबपाणी मिसळा. काही वेळ हे मिश्रण असेच ठेवा. ओट्स काही काळ फुगू द्या. काही वेळानंतर हे उटणं चेहरा आणि शरीरावर लावावे आणि स्क्रब करत त्वचा स्वच्छ करावी. थोड्या वेळाने कोमट पाण्याने स्नान करावे. यामुळे त्वचेत असलेल्या मृत पेशी सहज दूर होतील.

कणीक आणि कच्चे दूध – या दिवाळीत आणखी छान दिसण्यासाठी हे उटणं वापरून पाहू शकता. पीठामध्ये स्क्रबिंग एजंट असतात, त्यामुळे ते त्वचा स्वच्छ करण्याचं काम करतं. त्वचेला चमकदार बनविण्यासाठी पिठात कच्चे दूध मिसळून त्याच वापर केला जाऊ शकतो. कच्चे दूध त्वचेला मॉयश्चराइझ करण्यास मदत करते. यामुळे रंगही उजळतो.

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.