जेव्हा नात्यात काही नाविन्य उरत नाही, नातं केवळ ओझं होतं, तेव्हा सावध राहा

तुम्ही तुमच्या रिलेशनशिपने आनंदी आहात? जर नसाल आणि तरीही नातं निभावत आहात तर तुम्ही 'रॉटन रिलेशनशिप' मध्ये आहात.

जेव्हा नात्यात काही नाविन्य उरत नाही, नातं केवळ ओझं होतं, तेव्हा सावध राहा
Follow us
| Updated on: Nov 05, 2024 | 10:09 PM

चांगल्या नात्याची व्याख्या काय असते ? काही लोकांच्या मते परस्परांना समजून घेणारं नातं असेल तर ते आरोग्यदायी असते. परंतू अनेकदा नात्यात सर्व समजूदारपणा असूनही अनेक जण आनंदी नसतात. त्यांना ते नातं ओझं वाटू लागते.अशा नात्यात प्रेमाची कमी आणि नाविन्य राहात नाही. नातं निभावणं एक ड्यूटी बनते. या रॉटन रिलेशनशिप म्हणतात. रॉटन म्हणजे कुजणे..कोणतीही वस्तू तेव्हा कुजते. जेव्हा तिच्याकडे लक्ष दिले जात नाही. रॉटन रिलेशनशिपमध्ये गुदमरणं, बेवफाई असते, आदर नसतो. केवळ उपकारापुरते नातं राहातं..

जगाच्या तुलनेत भारतात घटस्फोटाचं प्रमाण केवळ एक टक्के आहे. परंतू अनेक जण आपल्या नात्यापासून आनंदी नाहीत. पती आणि पत्नी एकाच छताखाली रहातात. परंतू त्यांच्यात प्रेम, आदर आणि बरोबरीचं गोष्ट आली तर नाती पोकळ होतात. कपल्समध्ये इगॅलिटेरियन पार्टनरशिप म्हणजे बरोबरी. जेव्हा दोन्ही पार्टनरमध्ये घराची जबाबदारी बरोबरीत वाटली गेली असेल तर नात्यात बॅलन्स येतो.पत्नीला नोकरी करुनही घराची जबाबदारी देखील खांद्यावर घ्यावी लागत असेल तर पत्नी एकटी पडते.असे नाते हळूहळू रॉटन रिलेशनशिपमध्ये परिवर्तित होते.

आजकालचे अनेक जोडप्यात संवाद रहात नाही. नवरा सुटीच्या दिवशी देखील मोबाईलमध्येच बिझी असतो. पत्नी दिवसभर घराचे काम आणि मुलांच्या संगोपणात बिझी असते. त्यामुळे दोघांमध्ये संवाद होतच नाही. त्यामुळे कपल्सनी बेडरुमच्या बाहेर मोबाईलला सोडून एकमेकांशी बोलले पाहीजे असे रिलेशन एक्सपर्टचे म्हणणे आहे.

जेव्हा कपल्स एकमेकांना प्रेमाने स्पर्श करतात तेव्हा शरीरातून ऑक्सिटॉक्सिन नावाचे लव्ह हार्मोन्स रिलीज होते. त्यामुळे दोघांचे प्रेम वाढत असते. परंतू महिला जेव्हा आई बनतात. तेव्हा अपत्याकडून मातेला ब्रेस्ट फीडींग करताना हे हार्मोन्स रिलीज होते. त्यामुळे पतीच्या जवळ जाण्याची त्यांची इच्छा कमी होते. हेल्थलाईनमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका सर्वेनुसार 26.7 टक्के महिलांनी सांगितले की मुल झाल्यानंतर वर्षभर त्या पतीच्या जवळ गेल्या नाहीत. तर 17.5 टक्के महिलांनी सांगितले की पाच वर्षे त्यांनी पतीशी संबंध प्रस्थापित केले नाहीत.

बाहेर प्रेमाचा शोध घेतात

अनेक आपण मनासारखे वागण्यासाठी कपल्स एकमेकांवर दबाव टाकतात. अनेक नात्यात मन मारुन कपल्स जगत असतात. ते केवळ लग्न तुटले तर आपण कसे जगणार याच भीतीमुळे हे नातं टीकवून ठेवतात. परंतू त्यात प्रेम राहात नाही. केवळ प्रेमाचा देखावा केला जातो. जे लोक रॉटन रिलेशनशिपमध्ये राहातात ते प्रेमाचा शोध लपून छपून घेत असतात. ग्लिटन डेटींग साईटने एक सर्वेक्षण केले त्यात 30 टक्के लोकांनी आपले लग्न झाल्याचे लपवून डेटिंग एपवर प्रोफाईल बनवले होते. ते आपल्या लग्नाने खूश नसतात त्यामुळे नव्या पार्टनरचा शोध घेतात. यामुळे अनैतिक संबंधाची सुरुवात होते.

नात्यात तेव्हा कटूता होते

जेव्हा पती-पत्नी आपापले जीवन स्वतंत्रपणे जगतात तेव्हाच हेल्दी रिलेशनशिप तयार होते.जर पत्नीला प्रवास करायला, मित्रांना भेटायला, स्पा करायला किंवा पतीला पार्टीला जाणे, बाहेर फिरणे आणि मित्रांसोबत खेळणे आवडत असेल तर त्यांना थांबवू नका. प्रत्येकाला स्वत:च्या पद्धतीने जगायला आवडते. त्यामुळे निरोगी नात्याचा एकच मंत्र आहे जगा आणि जगू द्या. परंतू जोडपी जेव्हा एकमेकांना विरोध करुन लागतात तेव्हा त्यांच्या नात्यात कटूता तयार होते.

Non Stop LIVE Update
“देवाभाऊ, जॅकेट भाऊ अन् दाढी भाऊ”, ठाकरेंच्या टीकेवर शिंदेंचा पलटवार
“देवाभाऊ, जॅकेट भाऊ अन् दाढी भाऊ”, ठाकरेंच्या टीकेवर शिंदेंचा पलटवार.
विधानसभेची रणधुमाळी सुरू अन् रासपच्या उमेदवाराकडून आत्महत्येचा प्रयत्न
विधानसभेची रणधुमाळी सुरू अन् रासपच्या उमेदवाराकडून आत्महत्येचा प्रयत्न.
तुम्ही एकदाही घरी पाठवलं नाही पण आता..,पवारांची राजकारणातून निवृत्ती?
तुम्ही एकदाही घरी पाठवलं नाही पण आता..,पवारांची राजकारणातून निवृत्ती?.
माझ्या विरोधात षडयंत्र अन्..., अजित दादांच्या उमेदवार सरोज अहिरे भावूक
माझ्या विरोधात षडयंत्र अन्..., अजित दादांच्या उमेदवार सरोज अहिरे भावूक.
'उठाव केला तेव्हा शंभूराज दोन पाऊलं माझ्या पुढं..', शिंदे म्हणाले...
'उठाव केला तेव्हा शंभूराज दोन पाऊलं माझ्या पुढं..', शिंदे म्हणाले....
धनुष्यबाण अन् शिवसेना कोणाची? सभेतून शिंदेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर
धनुष्यबाण अन् शिवसेना कोणाची? सभेतून शिंदेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर.
पवारांसमोर चिमुकल्याचं तुफान भाषण, 'लाडक्या बहिणींनो दाजींला सांगा...'
पवारांसमोर चिमुकल्याचं तुफान भाषण, 'लाडक्या बहिणींनो दाजींला सांगा...'.
'लाडक्या बहिणीं'साठी तुमचा हा भाऊ 10 वेळा जेलमध्ये जायला तयार पण...'
'लाडक्या बहिणीं'साठी तुमचा हा भाऊ 10 वेळा जेलमध्ये जायला तयार पण...'.
राज ठाकरेंच्या टीकेवर फडणवीसांच प्रत्युत्तर, शिंदेंवर जनतेचा विश्वास..
राज ठाकरेंच्या टीकेवर फडणवीसांच प्रत्युत्तर, शिंदेंवर जनतेचा विश्वास...
फडणवीसांच्या लाडक्या ताईंना... रश्मी शुक्लांवरुन राऊतांची सरकारवर टीका
फडणवीसांच्या लाडक्या ताईंना... रश्मी शुक्लांवरुन राऊतांची सरकारवर टीका.