पुरुषांना आकर्षित कसं कराल?; हे माहीत नसेल तर काहीच माहीत नाही…

पुरुषांना आकर्षित करण्यासाठी, सहज उपलब्ध होऊ नका आणि जास्त रस दाखवू नका. त्यांच्या संदेशांना लगेच प्रतिसाद देण्याऐवजी, थोडा वेळ द्या आणि तुमच्या आयुष्यात स्वतःवर लक्ष केंद्रित करा. आत्मविश्वास आणि स्वातंत्र्याने त्यांना तुमच्याकडे आकर्षित करा. तुमच्या आवडी आणि मित्रांवर लक्ष केंद्रित करणे हेही महत्त्वाचे आहे. या सर्व गोष्टींमुळे त्यांना तुमच्याकडे अधिक आकर्षण वाटेल.

पुरुषांना आकर्षित कसं कराल?; हे माहीत नसेल तर काहीच माहीत नाही...
Follow us
| Updated on: Dec 08, 2024 | 3:44 PM

तुम्हाला एखाद्या पुरुषाला आकर्षित करायचं असेल तर काय कराल? अशा काही गोष्टी आहेत की तुम्ही त्यांचं लक्ष तुमच्याकडे वळवू शकता. मानसशास्त्रानुसार, पुरुषांना आकर्षित करण्यासाठी उलटी पद्धत वापरतात. या पद्धतीनेच योग्य परिणाम साधता येतो! याचा अर्थ फसवणूक किंवा कपट करणं असा नाही. अशा काही गोष्टी आहेत, की त्यामुळे त्यांना तुमच्याकडे तुम्ही सहज आकर्षित करू शकाल. तुम्हाला त्यांना मिळवायचंच असेल तर तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागतील. कोणत्या आहेत या गोष्टी?

सहज उपलब्ध होऊ नका

तुमच्या आणि त्याच्या दरम्यान एक “स्पेस” तयार करणे महत्वाचे आहे. जर तुम्ही त्याला कायम कॉल किंवा मेसेज करत राहिलात, तर त्याला तुम्ही सहज उपलब्ध आहात असं वाटू शकतं. त्याच्या कॉल किंवा मेसेजला खुशीने उत्तर दिले तरी, त्याला तुमच्या व्यस्ततेचा अंदाज येऊ द्या. जेव्हा त्याला तुम्ही सहज उपलब्ध नाही असं वाटेल, तेव्हा त्याला तुमची आठवण येऊ लागेल.

फार रस दाखवू नका

तुम्ही जास्त आहारी गेल्यास तुमच्याबद्दलचं त्याचं आकर्षण कमी होईल. त्याच्यात प्रत्येकवेळी रस दाखवू नका, थोडी कमी रुची दाखवा. नेहमी तुम्हीच मेसेज पाठवू नका. फोन करू नका. थोडा संयम ठेवा. तुम्ही रसिक नाहीत, किंवा तुमचा त्यांच्यात इंटरेस्ट नाही ही भावना त्यांच्या मनात येऊ द्या. त्यामुळे ते तुमच्याकडे अधिक आकर्षित होतील.

काही गोष्टी बदलून पहा

कधी कधी बदल आवश्यक असतो! काही गोष्टी बदलून पहा. त्याच्या मेसेजला प्रतिक्रिया देण्यास थोडा वेळ घ्या किंवा कधी तरी काही प्लान रद्द करा. अचानक केलेलं हे कृत्य त्याला विचारात टाकू शकतात आणि त्याला तुमच्याशी बोलण्याची किंवा तुम्हाला पाहण्याची इच्छा वाढवू शकते.

आत्मविश्वास ठेवा

नेहमी त्याची वाट पाहत राहू नका, त्याऐवजी स्वतःच्या आयुष्यावर लक्ष केंद्रित करा. तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींमध्ये वेळ घालवा. जसे की मित्रांसोबत गप्पा मारणे, तुमच्या आवडींमध्ये लक्ष घालणे, आणि स्वतःच्या सुधारणा आणि विकासावरभर देणे. जेव्हा तो पाहील की तुम्हाला त्याची गरज नाही, आणि तुम्ही स्वतःसुद्धा आनंदी राहू शकता, तेव्हा तो तुमच्याकडे अधिक आकर्षित होऊ शकतो.

मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.