कोविडनंतर हाडांमध्ये होत आहेत वेदना ? या धोकादायक आजाराचे आहे लक्षण

ॲव्हॅस्क्युलर नेकरोसिस हा एक असा आजार आहे ज्यामध्ये हाडांचे टिश्यू मृत होऊ लागतात, ज्यामुळे हाडं कमकुवत होऊ लागतात. 

कोविडनंतर हाडांमध्ये होत आहेत वेदना ? या धोकादायक आजाराचे आहे लक्षण
Follow us
| Updated on: Oct 08, 2022 | 11:58 AM

कोविडनंतर अनेकांना सांधेदुखी आणि हाडं दुखण्याचा त्रास होत आहे. लोकांना ही सामान्य समस्या किंवा संधिवाताचे लक्षण वाटत आहे, पण असे नाहीये. बऱ्याच प्रकरणांमध्ये रुग्णांना ॲव्हॅस्क्युलर नेकरोसिस (Avascular necrosis)हा रोग देखील होत आहे. सेंटर फॉर नी अँड हिप केअरचे वरिष्ठ प्रत्यारोपण सर्जन डॉ. अखिलेश यादव सांगतात की, ॲव्हॅस्क्युलर नेकरोसिस हा एक असा आजार आहे ज्यामध्ये हाडांचे टिश्यू (bone tissue)मृत होऊ लागतात, ज्यामुळे हाडं (bones)कमकुवत होऊ लागतात.

जेव्हा हाडांच्या टिश्यूपर्यंत रक्त पोहोचत नाही, तेव्हा अशा परिस्थितीत या आजारामुळे धोका निर्माण होऊ शकतो. हा आजार कोणत्याही वयात होऊ शकतो, मात्र सहसा 20 ते 60 या वयोगटातील लोकांना याचा त्रास होतो. ज्या लोकांना आधीच मधुमेह, एचआयव्ही/ एड्सचा हा आजार आहे, त्यांनाही आहे, त्यांनाही ॲव्हॅस्क्युलर नेकरोसिस आजार होण्याचा धोका असतो. डॉ. अखिलेश स्पष्ट करतात की, जेव्हा एखाद्या व्यक्तीचे हाड तुटतं तेव्हा रक्त हाडांपर्यंत नीट पोहोचत नाही. तसेच दारूच्या अतिसेवनामुळेही हा आजार होतो. जिमला जाणारे, व्यायाम करणाऱ्या तरूण व्यक्ती सप्लिमेंट्समध्ये स्टेरॉइड्सचं सेवन करतात. यामुळे हाडांचेही नुकसान होते आणि त्यांना या आजाराला बळी पडावे लागते.

कोव्हिड नंतर या आजाराच्या केसेसमध्ये लक्षणीयरित्या वाढ झाली आहे. ॲव्हॅस्क्युलर नेकरोसिस हा आजारा काही व्यक्तींचे कोपर आणि सांध्यामध्येही होऊ शकते. या आजाराची लक्षणे वेळीच ओळखून त्यावर उपाय करणे गरजेचे आहे अन्यथा या आजरामुळे हाडांचे संपूर्णपणे नुकसान होऊ शकते.

हे सुद्धा वाचा

ॲव्हॅस्क्युलर नेकरोसिसची लक्षणे :

– वजन उचलताना किंवा व्यायाम करताना सांध्यांमध्ये वेदना होणे

– हात आणि खांदे दुखणे

– पाय आणि गुडघ्यात वेदना होणे.

ॲव्हॅस्क्युलर नेकरोसिस पासून बचाव करण्यासाठी उपाय :

– मद्यपान कमी करावे.

– कोलेस्ट्रॉलची पातळी कमी ठेवावी.

– स्टेरॉइड्सचे सेवन करू नका.

– धूम्रपान करणे टाळावे.

– वजन वाढू देऊ नये.

– वेळोवेळी आरोग्य तपासणी करून घ्यावी.

ॲव्हॅस्क्युलर नेकरोसिसवरील उपाय :

डॉ. अखिलेश यांच्या सांगण्यानुसार, ॲव्हॅस्क्युलर नेकरोसिसचा उपचार हा त्या आजाराची तीव्रता किती आहे, त्यावर अवलंबून असतो. सुरुवातीला औषधोपचार आणि थेरपी दिली जाते. औषधोपचारानंतरही आराम मिळाला नाही तर शस्त्रक्रिया केली जाते. यासाठी कोअर डिकॉम्प्रेशन केले जाते. यामध्ये सर्जन हाडांचा आतील थर काढून टाकतात. यामुळे केवळ वेदनांमध्ये आराम मिळत नाही तर त्या ठिकाणी हाडांच्या नवे टिश्यूही तयार होऊ लागतात.

हाड प्रत्यारोपण : या प्रक्रियेत सर्जन आजारी हाडं बदलून त्याजागी निरोगी हाडाचे प्रत्यारोपण करतात. हे हाड शरीराच्या इतर कोणत्याही भागातूनही घेतले जाऊ शकते.

जॉइंट रिप्लेसमेंट : यामध्ये जीर्ण झालेले सांधे काढून त्याजागी प्लास्टिक, धातू किंवा सिरॅमिकचे सांधे लावले जातात.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.