थंडीत अंघोळीसाठी उकळते पाणी घेताय? सावधान…होऊ शकतात गंभीर दुष्परिणाम

हिवाळ्यात त्वचा कोरडी होते. त्यामुळे आंघोळ करताना कोणत्याही गोष्टीने त्वचेला जोरात रगडू नका. आंघोळीनंतर टॉवेलने स्वतःला कोरडे करू नका. यामुळे तुमची त्वचा खराब होऊ शकते. तसेच ती आणखी कोरडीही होऊ शकते.

थंडीत अंघोळीसाठी उकळते पाणी घेताय? सावधान...होऊ शकतात गंभीर दुष्परिणाम
Follow us
| Updated on: Nov 10, 2024 | 4:15 PM

Hot Water Bath : दिवाळी संपली की हिवाळ्याची चाहूल लागते. हिवाळा ऋतू अनेकांच्या आवडीचा ऋतू आहे. हिवाळ्यात शक्य होईल तेवढ्या गरम खाण्याच्या आणि पिण्याचा गोष्टीचा आपण विचार करतो. बहुतांश लोक थंडीत उकळते गरम पाणी घेण्याला प्राधान्य देतात. मात्र अंघोळीचे पाणी हे किती गरम असावे, थंडीत किती गरम पाण्याने अंघोळ करावी, याची माहिती नुकतीच समोर आली आहे.

हिवाळ्यात आंघोळीसाठी ९०°F आणि 105°F (32°C- 40°C) दरम्यान आदर्श तापमान मानले जाते. तुमच्या शरीराच्या सरासरी तापमानापेक्षा किंचित जास्त असणे अपेक्षित आहे. तुम्ही पाण्यात हात ठेवून तापमान तपासू शकता. गरम पाण्याने अंघोळ केल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात, ज्यामध्ये चांगली झोप समाविष्ट आहे. तणाव कमी होतो. जर तुम्ही शारीरिकदृष्ट्या सक्रिय असाल तर कोमट पाण्याने अंघोळ केली तर तुमच्या स्नायूंना खूप आराम मिळतो.

काही विशेष संशोधनात असे दिसून आले आहे की कोमट पाण्याने अंघोळ करणे आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते. पण पाणी हे किंचित उबदार किंवा कोमट असले पाहिजे. उकळते गरम पाणी घेणे टाळा. जास्त गरम पाण्याने अंघोळ केल्याने अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. आंघोळ करताना खूप घाम येत असेल तर समजून जा की पाणी खूप गरम आहे. आपण त्यात थंड पाणी घालू शकता. बाथटब मध्ये थोडेसे थंड पाणी घालत राहा, यामुळे तुम्हाला आराम मिळेल. गरम पाण्याने अंघोळ केल्याने खूप आराम मिळतो, पण जास्त गरम पाणी आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

या गोष्टींची काळजी घ्या

मॉइश्चरायझेशन: आंघोळ केल्यानंतर लगेच मॉइश्चराइजर लावा.

गरम हवा टाळा : हॉट एअर ब्लोअर वापरणे टाळा.

त्वचा कोरडी ठेवा: हायड्रेटिंग बॉडी वॉश, सौम्य शाम्पू आणि कंडिशनर वापरा.

आर्द्रता राखा: घरामध्ये आद्रता कायम ठेवा.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.