उन्हाळ्यात ‘हे’ पदार्थ खाणे शक्यतो टाळाच, वाचा याबद्दल अधिक !
उन्हाळा म्हटंले की, खाण्याकडे विशेष लक्ष दिली पाहिजे. थोडासा निष्काळजीपणा आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
मुंबई : उन्हाळा म्हटंले की, खाण्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. थोडासा निष्काळजीपणा आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. तीव्र उष्णतेमुळे उष्माघात, निर्जलीकरण आणि कोरडेपणासह इतर आरोग्याच्या समस्या उद्भवतात. मात्र, उन्हाळ्यात प्रत्येकालाच घरात बसणे देखील शक्य नसते. कामानिमित्त बाहेर पडावे लागतेच मात्र, घराच्या बाहेर पडण्याच्या अगोदर योग्य आहारात आणि शरीराची विशेष काळजी घेणे आपल्या आरोग्यासाठी गरजेचे आहे. (Avoid eating these foods in summer)
-उन्हाळ्यामध्ये आहारात अनेक पदार्थ घेणे शक्यतो टाळले पाहिजे. नेमके कुठले पदार्थ घेणे आहारात टाळले पाहिजेत हे आज आपण बघणार आहोत.
-मसालेदार पदार्थ शरीरातील उष्णता वाढवतात आणि यामुळे आपल्या चेहऱ्यावर मुरुम देखील येतो. ते पाचन प्रक्रियेवर देखील परिणाम करतात. म्हणूनच, आपण उन्हाळ्यात मसालेदार पदार्थ खाणे टाळले पाहिजेत.
-उन्हाळ्यात तेलकट आणि तळलेले खाणे पूर्णपणे टाळलेच पाहिजे. उन्हाळ्यात आहारात जास्त तेलकट पदार्थ घेतले तर आपला चेहरा देखील तेलकट दिसतो.
-उन्हाळ्यात जर आपणास आपले शरीर थंड ठेवायचे असेल तर चहा आणि कॉफी पिणे टाळा. त्याऐवजी तुम्ही लिंबू पाणी, आंबा पन्ने, जिरे पाणी, ताक, लस्सी याचे सेवन करू शकतात.
-उन्हाळ्याच्या हंगामात बहुतेक लोकांना आंबे खाण्यासाठी आवडतात. आंबे खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. मात्र, प्रमाणा बाहेर आंबे खाणे आरोग्यासाठी घातक आहे. आंबा खाल्ल्याने शरीरातील उष्णता वाढते आणि पचन प्रक्रियेवरही परिणाम होतो.
-उन्हाळ्यात थंड पाणी पिण्यामुळे आपली तहान भागवते परंतु अतिशय तापलेल्या उष्णतेमुळे थंड पाणी पिणे टाळले पाहिजे. थंड पाणी प्यायल्यामुळे आजारी पडण्याची शक्यता असते.
संबंधित बातम्या :
Milk Testing : सावधान! घट्ट दिसण्यासाठी दुधात मिसळले जातायत ‘हे’ घटक, अशी तपासा दुधाची शुद्धता
सावधान! अपुरी झोप स्त्रियांसाठी घातक, कर्करोगासह ‘या’ गंभीर समस्यांना ठरेल कारणीभूत…
Skin Care Tips | हेल्दी आणि चमकदार त्वचेसाठी ‘या’ सवयी गरजेच्या!https://t.co/gB4ZfQIj8t#skincare #skincareroutine #glowingskin
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 9, 2020
(Avoid eating these foods in summer)