Rainy season : पावसाळ्यात ओले कपडे वापरल्यास वाढू शकतो त्वचा विकारांचा धोका

skin problems : पावसाळ्यात त्वचेच्या विकारांचा, समस्येचा धोका अधिक वाढू शकतो. पावसात भिजून येणे, ओल्या कपड्यांसह तसेच वावरणे, अर्धवट वाळलेले कपडे, विशेषत: अंतर्वस्त्र वापरणे या सर्व गोष्टींमुळे त्वचेच्या समस्या वाढू शकतात.

Rainy season : पावसाळ्यात ओले कपडे वापरल्यास वाढू शकतो त्वचा विकारांचा धोका
पावसाळ्यात ओले कपडे वापरल्यास वाढू शकतो त्वचा विकारांचा धोका Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jul 15, 2022 | 1:30 PM

सर्वांना आडणारा, हवाहवासा वाटणारा पावसाळा (Rainy season) त्याच्यासोबतच अनेक आजार घेऊन येतो. या काळात सततच्या ओलसर वातावरणामुळे त्वचेचे विकारही (skin problems) होण्याची शक्यता वाढते. पावसात भिजणे, ओले कपडे अंगावर घालूनच दिवसभर वावरणे, अर्धवट वाळलेले कपडे, विशेषत: अंतर्वस्त्र वापरणे या सर्व गोष्टींमुळे काखेतील, जांघेचील त्वचा ओलसर राहून त्वचेच्या समस्या वाढू शकतात. पावसात बाहेर पडणे, भिजणे शक्यतो टाळले पाहिजे. ते दरवेळेस शक्य नसेल तर भिजल्याावर डोकं आणि शरीर लगेच पूर्ण कोरडं करणे, ओलसर कपडे न घालणे (avoid wet clothes) अशा उपायांनी त्वचा विकार टाळता येतात. तसेच सैलसर कपडे घालणे, हातापायांची नीट स्वच्छता राखणेही या ऋतूत फार आवश्यक असते.

पावसाळ्यात टाळा या गोष्टी

पावसाळ्यात घट्ट कपडे घालणे टाळा. थोडे सैलसर, कॉटनचे कपडे घालावेत. जरी पावसाक भिजलात तरी हे कपडे लगेच वाळतात व पुढील त्रास वाचतो. ऑफीसमध्ये कपड्यांची एखादी एक्स्ट्रॉ जोडी ठेवावी. खूप भिजल्यास, तसेच न वावरता शरीर शक्य होईल तितके वाळवावे. हात-पायांच्या बोटांमधील जागा पूर्ण कोरडी करावी, खडखडीत वाळलेले आतले कपडे (अंतर्वस्त्र) वापरावे, अन्यथा त्या भागांतही स्कीन इन्फेक्शन होऊ शकते. पावसात ओले मोजे वापरू नका. दुसऱ्यांचा कंगवा, टॉवेल वा कपडे बिलकूल चप्पल- बूटातील पाणी पूर्ण काढून ते वाळवा, अन्यथा त्यामुळे त्वचा विकार वाढीस लागू शकतात. तसेच हाता-पायांची नखे वेळच्यावेळी कापा, ॲंटी-बॅक्टेरिअल साबण वापरा. या सर्व उपायांनी , फंगल इन्फेक्शन रोखू शकता. तरीही इन्फेक्शन झाल्यास त्वरित डॉक्टरांना दाखवून वेळच्यावेळी औषधे घ्या. ती ट्रीटमेंट पूर्ण करा, मध्येच सोडू नका, अन्यथा इन्फेक्शन पसरण्याचा धोका वाढू शकतो.

ह्या गोष्टी करा

पावसाळ्यात आपले पाय सतत ओले होतात. पायांच्या बोटांमधील बेचक्यामध्ये ओलावा राहिल्यास इन्फेक्शन, चिखली होऊ शकते. त्यामुळे स्वच्छ धुवून कोरडे करा. तसेच पाणी साचणार नाही अशा पादत्राणांचा वापर करा. बूट वापरावे लागलेच तर त्यात बिलकूल पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्या. पुढील वापरापूर्वी बूट पूर्ण कोरडे करा. ओले मोजे वापरणे टाळा.

हे सुद्धा वाचा

फंगल इन्फेक्शन

त्वचा ओलसर राहिल्यामुळे हाता-पायाच्या बेचक्यांमध्ये काखेत, जांघेत खाज येते व इन्फेक्शन वाढते. रिंगच्या आकारातील, लालसर रंगाचे व प्रचंड खाज सुटणारे गजकर्णसारखे इन्फेक्शन हातावर, पाठीवर , पोटावर, चेहरा आणि डोक्यावरही होऊ शकते. हा आजार लहानांपासून- मोठ्यापर्यंत कोणालाही होऊ शकतो. हा त्रास संसर्गजन्य असल्याने एकाकडून दुसऱ्या व्यक्तीकडे सहज पसरू शकतो. त्यावर व्यवस्थित उपचार घेतल्यास तो सहज बरा होऊ शकतो.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.