चमकदार त्वचेसाठी केळीचा फेसपॅक अत्यंत फायदेशीर, वाचा !
केळी खाणे हे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे. मात्र, केळी हे फक्त आपल्या आरोग्यासाठीच नाहीतर आपल्या त्वचेसाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे.
मुंबई : केळी खाणे हे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे. मात्र, केळी हे फक्त आपल्या आरोग्यासाठीच नाहीतर आपल्या त्वचेसाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे. केळीमध्ये पोटॅशियम, मूड-रेगुलेटिंग फोलेट, ट्रायटोफन आणि एनर्जाइजिंग कार्ब्स देखील असतात. केळी पोटॅशियमने समृद्ध आहेत. केळी आपल्या शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करतात आणि शरीराला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते. केळीमध्ये 100 कॅलरी उर्जा असते, ज्यामुळे तुमचे शरीर दिवसभर सफुर्तीवान राहते. (Banana face pack is extremely beneficial for glowing skin)
जर त्वचेमध्ये उग्रपणा वाढत असेल तर उष्मा आणि सूर्यप्रकाशामुळे चेहऱ्यावर किंवा शरीरात इतरत्र ठिपके तयार होतात तर केळी आणि लिंबाचा रस रामबाण उपाय म्हणून वापरता येतो.
-अर्धी केळी
-अर्धा लिंबू
प्रथम केळी मॅश करून पेस्ट बनवा. आता या पेस्टमध्ये लिंबू पिळून घ्या. तयार मिश्रणाने बाधित त्वचेची मालिश 5 ते 7 मिनिटे आणि नंतर 15 मिनिटांवर ठेवा. त्यानंतर ते ताजे पाण्याने धुवा आणि ते स्वच्छ करा. आपण दररोज वापरू शकता.
जर आपल्या त्वचेवरचे तेज कमी झाले असले आणि तेज परत आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल तर आज आम्ही एक खास फेसपॅक सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही चेहऱ्यावरची चमक वाढू शकतात.
-एक केळी
-गुलाब पाणी
-मध
-तीन चमचे दूध
हे सर्व साहित्य एकत्र मिक्स करा आणि चेहऱ्यावर लावा. साधारण वीस मिनिटे ही पेस्ट चेहऱ्यावर तशीच ठेवा आणि 25 ते 30 मिनिटे ठेवा. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. हा फेसपॅक आठवड्यातून तीन वेळा लावला तर आपली त्वचा चांगली होण्यास मदत होईल.
संबंधित बातम्या :
Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो
Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!
Skin Care | कोरड्या त्वचेने हैराण? क्रीमही काम करत नसतील, तर वापरा घरगुती ‘उटणं’!#SkinCare | #skincareroutine | #homeremedies | #BeautySecrets https://t.co/2j7jbRm7bJ
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 5, 2021
(Banana face pack is extremely beneficial for glowing skin)