केळीचा हा फेसपॅक एकदा वापरून पाहा, त्वचेच्या अनेक समस्या नक्कीच दूर होतील

चमकदार आणि सुंदर त्वचा मिळवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. मात्र निरोगी आणि हेल्दी त्वचा मिळवण्यासाठी आपण काही घरगुती उपाय देखील करू शकतो. ज्यामुळे आपली त्वचा सुंदर दिसण्यास मदत होते.

केळीचा हा फेसपॅक एकदा वापरून पाहा, त्वचेच्या अनेक समस्या नक्कीच दूर होतील
सुंदर त्वचा
Follow us
| Updated on: Jun 11, 2021 | 7:09 AM

मुंबई : चमकदार आणि सुंदर त्वचा मिळवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. मात्र निरोगी आणि हेल्दी त्वचा मिळवण्यासाठी आपण काही घरगुती उपाय देखील करू शकतो. ज्यामुळे आपली त्वचा सुंदर दिसण्यास मदत होते. आज आम्ही तुम्हाला एक खास फेसपॅक सांगणार आहोत. ज्यामुळे त्वचा चांगली होण्यास मदत होईल. केळी आपल्या त्वचेसाठी फायदेशीर असते. (Banana face pack is extremely beneficial for the skin)

केळीचा फेसपॅक आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर असतो. केळीचा फेसपॅक घरी तयार करण्यासाठी एक केळी, एक चमचा दही, एक चमचा मध, लिंबाचा रस एक चमचा, मुलतानी माती एक चमचा, अर्धा चमचा हळद आणि गुलाब पाणी हे साहित्य लागणार आहे. सर्वात अगोदर केळी बारीक करून घ्या आणि त्यामध्ये मध, हळद, मुलतानी माती, दही, लिंबाचा रस आणि गुलाब पाणी मिक्स करा आणि चांगली पेस्ट तयार करा. यानंतर ही पेस्ट वीस मिनिटे तशीच ठेवा आणि चेहऱ्यासोबत मानेवर लावा.

तीस मिनिटांनंतर थंड पाण्याने आपला चेहरा धुवा. ही पेस्ट आपण आठवड्यातून तीन वेळा चेहऱ्याला लावली पाहिजे. यामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. केळीची साल त्वचेसाठी खूप फायदेशीर असते. त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी आपण केळीची साल वापरू शकता. यासाठी 3 चमचे साखर, ओटचे पीठ, केळीच्या सालाची पूड घ्या. आता या तीन गोष्टी ग्राइंडरमध्ये बारीक करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहर्‍यावर लावा आणि कोरडे झाल्यावर पाण्याने धुवा. केळीच्या सालीमध्ये मध आणि हळद मिसळा.

हे मिश्रण केळ्यासह चेहऱ्यावर घासून घ्या. 10 ते 15 मिनिटे चेहऱ्यावर हे तसेच ठेवा. नंतर ते पाण्याने धुवा आणि एका कपड्याने चेहरा पुसा. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर काकडी आणि टोमॅटो पॅक तुमच्यासाठी उत्तम. यासाठी, आपल्याला एक टोमॅटो आणि दोन चमचे काकडीची पेस्ट, एक चमचे मध मिसळावे लागेल. ही पेस्ट 15-20 मिनिटे आपल्या चेहऱ्यावर ठेवा. यानंतर ते कोमट पाण्याने धुवा. 2 चमचे ओटच्या जाड भरड्या पिठामध्ये टोमॅटोचा पेस्ट 2 चमचे मिसळावी. यानंतर त्यात दही घालावे. हे लॅक्टिक अॅसिड, टॉक्झिन्स आणि छिद्र साफ करण्यास मदत करते.

संबंधित बातम्या : 

पोटाचा घेर कमी करण्यासाठी आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश करा

दररोज नारळ पाणी प्या, व्यायाम न करता 10 किलो वजन घटणार, पाहा कसं?

(Banana face pack is extremely beneficial for the skin)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.