Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चेहऱ्यावरील काळे डाग दूर करण्यासाठी केळीची साल फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक !

केळी एक सुपर फूड म्हणून ओळखले जाते. केळीमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असतात. आ

चेहऱ्यावरील काळे डाग दूर करण्यासाठी केळीची साल फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक !
केळीचे साल
Follow us
| Updated on: May 24, 2021 | 10:01 AM

मुंबई : केळी एक सुपर फूड म्हणून ओळखली जाते. केळीमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असतात. आपल्या सर्वांना केळीच्या फायद्याबद्दल माहिती आहे. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का? की, केळीची साल सुध्दा आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे. विशेष: आपल्या त्वचेसाठी केळीची साल गुणकारी आहे. केळीचा साल आपल्या चेहऱ्यावर चोळली तर आपली त्वचा चांगली होते आणि चेहऱ्यावरील मुरूमाची समस्या कायमची दूर होण्यास मदत होते. (Banana peel is beneficial for removing blemishes on the face)

केळीच्या सालीचा स्क्रब केळीची साल त्वचेसाठी खूप फायदेशीर असते. त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी आपण केळीची साल वापरू शकता. यासाठी 3 चमचे साखर, ओटचे पीठ, केळीच्या सालाची पूड घ्या. आता या तीन गोष्टी ग्राइंडरमध्ये बारीक करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहर्‍यावर लावा आणि कोरडे झाल्यावर पाण्याने धुवा.

केळीची साल आणि मध  केळीच्या सालीमध्ये मध आणि हळद मिसळा. हे मिश्रण केळ्यासह चेहऱ्यावर घासून घ्या. 10 ते 15 मिनिटे चेहऱ्यावर हे तसेच ठेवा. नंतर ते पाण्याने धुवा आणि एका कपड्याने चेहरा पुसा.

डार्क सर्कल्स आपल्या डोळ्यांखाली डार्क सर्कल्स तयार झाली असतील तर ती समस्या दूर करण्यासाठी आपण केळीची साल वापरू शकतो. यासाठी केळीच्या सालीमध्ये कोरफड मिक्स करा आणि ते चेहऱ्यावर लावा. 10 मिनिटांनी पाण्याने चेहरा धुवा. आठवड्यातून 3 दिवस हा उपाय करून पहा.

तेलकट त्वचेसाठी केळ्याची साल ग्राइंडरमध्ये बारीक करून घ्या आणि त्याची पेस्ट बनवा. जर आपले त्वचा तेलकट असतील, तर त्यात कोरफड घालता आणि चेहऱ्याला लावा. यामुळे चेहरा चमकदार होता. आठवड्यातून 3 ते 4 वेळा ही पेस्ट तयार करून चेहऱ्याला लावा.

या गोष्टी लक्षात ठेवा!

– वापरासाठी केळ्याची साल नेहमी ताजी असावी.

– केळीची साल साठवून ठेवू नका.

– केळी बर्‍याच लोकांना पचत नाहीत. अशा लोकांनी कोणत्याही प्रकारे त्याचा त्वचेवर वापर करू नये.

– सालाची पेस्ट राहिल्यास ती रेफ्रिजरेटरमध्ये ठेवता येते. तथापि, एका दिवसापेक्षा जास्तकाळ ठेवू नका.

– केळीची साल सोलल्यानंतर किंवा चेहऱ्यावर वापरल्यानंतर तुम्हाला काही समस्या आल्यास त्याचा वापर थांबवा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Skin Care | चेहऱ्यावर चुकूनही लावू नका ‘या’ गोष्टी, अन्यथा होऊ शकते त्वचेचे नुकसान!

Dieting Side Effects | डाएटिंग करताय? ‘ही’ लक्षणे दिसताच त्वरित थांबणे ठरेल फायदेशीर!

(Banana peel is beneficial for removing blemishes on the face)

सामंत अन् भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट, कारण काय? काय झाली चर्चा?
सामंत अन् भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट, कारण काय? काय झाली चर्चा?.
वर्ष अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो येणार
वर्ष अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो येणार.
ईडी कार्यालयाबाहेर कॉंग्रेसचं आंदोलन; खासदार वर्षा गायकवाड जखमी
ईडी कार्यालयाबाहेर कॉंग्रेसचं आंदोलन; खासदार वर्षा गायकवाड जखमी.
ATM: प्रवास करताना पैसे संपले तरी आता धावत्या रेल्वेत पैसे काढता येणार
ATM: प्रवास करताना पैसे संपले तरी आता धावत्या रेल्वेत पैसे काढता येणार.
वाघ्याच्या वादात पडळकरांची उडी, पवारांवर टीकास्त्र तर उदयनराजेंबद्दल..
वाघ्याच्या वादात पडळकरांची उडी, पवारांवर टीकास्त्र तर उदयनराजेंबद्दल...
'दारात आलेल्या कुत्र्याला..', भिडेंच्या आडून राजू पाटलांचा टोला कोणाला
'दारात आलेल्या कुत्र्याला..', भिडेंच्या आडून राजू पाटलांचा टोला कोणाला.
निर्धार नाही, पक्ष बचाव मेळावा आहे; संजय शिरसाट यांची टीका
निर्धार नाही, पक्ष बचाव मेळावा आहे; संजय शिरसाट यांची टीका.
अमरावतीचं माझ्यावर कर्ज,फडणवीस विमानतळाच्या लोकार्पणानंतर काय म्हणाले?
अमरावतीचं माझ्यावर कर्ज,फडणवीस विमानतळाच्या लोकार्पणानंतर काय म्हणाले?.
मुलुंडमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी शिक्षकाच्या अंगावर फेकला कोळसा
मुलुंडमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी शिक्षकाच्या अंगावर फेकला कोळसा.
'या' जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई अन् तरूणांना लग्नासाठी कुणी मुली देईना
'या' जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई अन् तरूणांना लग्नासाठी कुणी मुली देईना.