‘व्हॅलेंटाईन डे’ला प्रेमात आंधळे झालात तर होईल फसवणूक, ‘ही’ खबरदारी घ्या आणि धोका टाळा

‘व्हॅलेंटाईन डे’साजरा होत असताना या दिवसांमध्ये आपण काही खबरदारीसुध्दा बाळगणे महत्वाचे असते. ज्यांची ‘रिलेशनशिप’ नुकतीच सुरु झाली आहे. त्यांनी आपल्या जोडीदाराला नीट पारखणे अत्यंत महत्वाचे आहे.

‘व्हॅलेंटाईन डे’ला प्रेमात आंधळे झालात तर होईल फसवणूक, 'ही' खबरदारी घ्या आणि धोका टाळा
प्रातिनिधीकImage Credit source: Wikipedia
Follow us
| Updated on: Feb 14, 2022 | 1:46 PM

मुंबई :व्हॅलेंटाईन डे’चा (Valentines Day) संपूर्ण आठवडा विविध ‘डेज्‌’ने आपण साजरा करीत असतो. या आठवड्यात प्रत्येक दिवसाचे एक महत्व असते. त्यानुसार आपण तो साजरा करीत असतो. विवाहित जोडपी एकमेकांसोबत ‘व्हॅलेंटाईन डे’चा आनंद घेतात. तर अनेक वर्षांपासून ‘रिलेशनशिप’मध्ये असलेले अविवाहितदेखील तितक्याच उत्साहात हा दिवस साजरा करतात. परंतु नुकत्याच काही दिवसांपूर्वीच नवे नाते सुरु केलेल्या ‘कपल्स्‌’नी (Couples)‘व्हॅलेंटाईन डे’च्या पार्श्वभूमीवर काही खबरदारी घेणे गरजेचे आहे. आपला जोडीदार आपली फसवणूक (Cheating) तर करत नाहीय ना, याची पडताळणी करणे आवश्‍यक असते. यामुळे फसवणुकीला बळी न पडतात. यातून फसवणूक कशी होते आणि तुम्ही ते कसे टाळू शकता ते जाणून घेणार आहोत. या टिप्सचा वापर करा आणि धोका टाळा.

1) जर तुम्ही कोणत्याही ‘डेटिंग अॅप’वर तुमचा जोडीदार शोधत असाल तर हे करण्याआधी सावधता बाळगावी. काही गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही अशी फसवणूक टाळू शकता. तुम्ही कोणत्याही ‘अॅप’वर सहज विश्वास ठेवू नका. कोणतेही अॅप ‘डाऊनलोड’ करण्यापूर्वी त्याच्याबद्दलच्या लोकांच्या प्रतिक्रिया नक्की जाणून घ्याव्यात.

2) ‘अॅप्स’वर आपली प्रोफाइल तयार करताना काही गोष्टी लक्षात ठेवा. त्यात चुकूनही तुमची सर्व माहिती भरू नका. तसेच, अॅपवर नोंदणी करताना तुमच्या नेहमीच्या मोबाइल क्रमांकाऐवजी वापरात नसलेला क्रमांक टाकण्याचा प्रयत्न करा. तुमचा ईमेल आयडी देणे टाळा आणि तुमचे सोशल मीडिया प्रोफाइलचीही माहिती त्यावर देउ नका.

3)  कुठलेही ‘अॅप’ वापरताना समोरची व्यक्ती किंवा ते ‘अॅप’आपल्या पूर्णत: अनोळखी असते. त्यामुळे त्यावर काहीही करताना सावधता बाळगा, तसेच त्यावर पैशांचा व्यवहार चुकूनही करुन नका. त्यावर कोणी तुमच्याकडे पैसे मागितले तर कधीही पैसे देउ नका.

4) ‘व्हॅलेंटाईन डे’च्या आठवड्यात अनेक जण आपला जोडीदार शोधण्याच्या प्रयत्नात असतात. त्यासाठी विविध‘अॅप्स’चा वापर केला जात असतो. त्या माध्यमातून आपली आपल्या जोडीदाराशी ओळखही होते. परंतु अशी ओळख करताना समोरच्या व्यक्तीची पूर्ण माहिती जाणून घ्या, अशा लोकांसोबत डेटींगला जाताना विशेष काळजी घ्या, निर्जन ठिकाणी जाउ नका, त्याच्यासोबत कुठल्याही प्रकारे फोटो काढू नका.

संबंधित बातम्या

Astro tips for travel : मुसाफिर हू यारो म्हणतं प्रवासाला निघताय ? मग वास्तूशास्त्रातील काही नियम लक्षात ठेवा नक्की फायदा होईल

मधुमेहींसाठी ‘हा’ ज्यूस वरदानापेक्षा कमी नाही, अवघ्या तीन तासांत दिसेल परिणाम

Constipation | तुमच्या चिमुरड्यांना बद्धकोष्ठाचा त्रास जाणवतोय? 4 घरगुती उपाय ठरतील परिणामकारक

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.