Beauty tips : लिपस्टिकमुळे ओठांचा रंग काळा झालाय का.. वापरून पहा ‘हे’ घरगुती उपाय; लवकरच ओठांना पुन्हा येईल गुलाबी रंग!

ओठ मऊ आणि गुलाबी असले तर ते तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढविते. त्यामुळे तुमचा चेहरा देखील फुलतो आणि सुंदर दिसतो, परंतु जेव्हा ओठांचा रंग जर काळा पडला असेल तर, ते खूप वाईट दिसतात. यासाठी काही घरगुती उपाय वापरूनही, तुमच्या ओठांचा रंग पूर्ववत होऊ शकतो.

Beauty tips : लिपस्टिकमुळे ओठांचा रंग काळा झालाय का.. वापरून पहा ‘हे’ घरगुती उपाय; लवकरच ओठांना पुन्हा येईल गुलाबी रंग!
लवकरच ओठांना पुन्हा येईल गुलाबी रंग!
Follow us
| Updated on: Jul 07, 2022 | 8:49 PM

चेहरा सुंदर बनवण्यासाठी महिला मेकअप करतात. परंतु मेकअपमध्ये वापरल्या जाणार्‍या उत्पादनांचे काही साइड इफेक्ट्स (Side effects) देखील होतात, ज्यामुळे तुमच्या सौंदर्यावर परिणाम होतो. लिपस्टिक हे देखील असेच एक उत्पादन आहे, ज्याच्या अतिवापराने ओठांचा रंग काळा होऊ शकतो. ओठांचा रंग (Lip color) गडद किंवा फिकट होतो तेव्हा केवळ चेहर्याचे सौंदर्य कमी होत नाही तर व्यक्ती आजारी दिसू लागते. प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी काळ्या ओठांची समस्या असते आणि याची अनेक कारणे असू शकतात. जीवनशैलीच्या अनेक सवयी आणि काही आजारांमुळे ओठांचा रंग बदलतो. दरम्यान, ओठ काळे होण्यामागे इतर कारणे असू शकतात जसे की धूम्रपान, औषधांचे साईड इफेक्ट, ऍलर्जी, सर्दी, जीवनसत्त्वांची कमतरता, रक्तातील साखरेची पातळी कमी होणे इत्यादी जर तुमच्या ओठांचा रंग देखील काळा झाला असेल तर येथे काही घरगुती उपाय (Home remedies) आहेत जे तुमची समस्या दूर करण्यात मदत करू शकतात.

ओठांना स्क्रब करा

गडद ओठांचा रंग परत येण्यासाठी वेळोवेळी ते स्क्रब करणे आवश्यक आहे, जेणेकरून ओठांची मृत त्वचा काढता येईल. यासाठी तुम्ही मध आणि बदामाचे तेल समान प्रमाणात घ्या आणि त्यात थोडी साखर मिसळा. ते ओठांवर लावा आणि हळू हळू स्क्रब करा. यामुळे तुमचे ओठ मऊ होतील आणि त्यांच्या रंगावरही चांगला परिणाम होईल.

ओठांचे पोषण करा

ज्याप्रमाणे तुमच्या शरीराला आणि त्वचेला पोषणाची गरज असते, त्याचप्रमाणे तुमच्या ओठांनाही वेळोवेळी पोषणाची गरज असते. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी एलोवेरा जेल लावून ओठांना मसाज करा. याशिवाय तुम्ही चांगल्या दर्जाची मॉइश्चरायझर क्रीम लावूनही मसाज करू शकता. यामुळे तुमच्या ओठांचे पोषण होते आणि त्यांच्या गुणवत्तेत फरक पडतो.

हे सुद्धा वाचा

झोपताना क्रीम लावा

असं म्हणतात की झोपताना क्रीम लावलं तरी ओठांच्या रंगावर खूप परिणाम होतो. क्रीममुळे ओठांचा रंग गुलाबी तर होतोच, पण ओठ मऊही होतात. रोज रात्री क्रीमने मसाज केल्याने तुम्हाला काही वेळात फरक दिसेल.

भरपूर पाणी प्या

तुम्ही पुरेसे पाणी प्यायले नाही तरी तुमच्या ओठांचा रंग निघून जातो. ओठ कोरडे आणि निर्जीव दिसतात. त्यामुळे त्यांना हायड्रेट ठेवणे फार महत्वाचे आहे. यासाठी तुम्ही भरपूर पाणी प्या.

धूम्रपान सोडणे

तुम्ही धूम्रपान करत असाल तर ही सवय लवकर सोडा. अन्यथा तुमचे उपाय कधीही त्यांचे काम पूर्ण करू शकणार नाहीत. याशिवाय चांगल्या दर्जाची लिपस्टिक लावा.

'...तर AK 47 घेऊन येतो', मयत मुलीच्या कुटुंबीयांना धमकी, CCTV समोर
'...तर AK 47 घेऊन येतो', मयत मुलीच्या कुटुंबीयांना धमकी, CCTV समोर.
'शिवराजने पंचांना गोळ्या घालायला...', पैलवान चंद्रहार पाटलांचं वक्तव्य
'शिवराजने पंचांना गोळ्या घालायला...', पैलवान चंद्रहार पाटलांचं वक्तव्य.
'मला भेटले तेव्हा मुंडेंसोबत कराड पण होता अन्...',जरांगेंचा गौप्यस्फोट
'मला भेटले तेव्हा मुंडेंसोबत कराड पण होता अन्...',जरांगेंचा गौप्यस्फोट.
'मराठ्यांचा संयम सुटला तर...',जरांगे पाटलांची सरकारला हात जोडून विनंती
'मराठ्यांचा संयम सुटला तर...',जरांगे पाटलांची सरकारला हात जोडून विनंती.
मुंडे यांचा राजीनामा होणार? अंजली दमानिया उद्या काय करणार गौप्यस्फोट?
मुंडे यांचा राजीनामा होणार? अंजली दमानिया उद्या काय करणार गौप्यस्फोट?.
'मविआ काळात तुमचे अब्बा होते, आता मस्ती नको',राणेंचा रोख नेमका कुणावर?
'मविआ काळात तुमचे अब्बा होते, आता मस्ती नको',राणेंचा रोख नेमका कुणावर?.
'गरिबांच्या मुलांवर अन्याय मात्र पंचांना...', राक्षेच्या आईचा सवाल
'गरिबांच्या मुलांवर अन्याय मात्र पंचांना...', राक्षेच्या आईचा सवाल.
'सामना'तून अर्थसंकल्पावर टीका, निर्मला सीतारामनांचा 'खडूस' असा उल्लेख
'सामना'तून अर्थसंकल्पावर टीका, निर्मला सीतारामनांचा 'खडूस' असा उल्लेख.
राक्षेनं पंचांना मारली लाथ, महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत अभूतपूर्व गोंधळ
राक्षेनं पंचांना मारली लाथ, महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत अभूतपूर्व गोंधळ.
'माझ्या नादाला लागू नको', जरांगे-भुजबळांमध्ये पुन्हा आरोप-प्रत्यारोप?
'माझ्या नादाला लागू नको', जरांगे-भुजबळांमध्ये पुन्हा आरोप-प्रत्यारोप?.