चमकदार आणि डाग विरहित त्वचा हवी असेल तर, ट्राय करा तांदळाचा फेसपॅक

जर तुम्हाला तुमचा चेहरा पूर्णपणे डागमुक्त आणि चमकदार करायचा असेल तर यासाठी एक प्रभावी उपाय आहे. तांदळाच्या पिठामुळे चेहऱ्यावरील डाग पुसट होतात आणि त्वचा चमकते जाणून घेऊया तांदळाच्या पिठापासून बनवलेल्या फेसपॅक बद्दल.

चमकदार आणि डाग विरहित त्वचा हवी असेल तर, ट्राय करा तांदळाचा फेसपॅक
Follow us
| Updated on: Nov 27, 2024 | 3:17 PM

आज काल प्रत्येकाला आपली त्वचा चमकदार आणि डागांपासून मुक्त हवी असते. यासाठी बाजारात अनेक महागडे क्रीम उपलब्ध आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की तुमच्या स्वयंपाक घरात असलेले तांदळाचे पीठ तुमच्या त्वचेसाठी वरदान पेक्षा कमी नाही. तुम्ही तांदळाच्या पिठाला तुमच्या सौंदर्याचे रहस्य बनवू शकतात. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील डाग हलके होतील आणि चेहऱ्यावर चमक येईल. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट, व्हिटॅमिन आणि मिनरल्स त्वचा निरोगी ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. जाणून घेऊया तांदळाच्या पिठापासून बनवलेल्या फेस पॅक बद्दल.

त्वचा स्वच्छ करते तांदळाचे पीठ त्वचेतील घान आणि अतिरिक्त तेल शोषून घेण्यास मदत करते. ज्यामुळे त्वचा स्वच्छ आणि मुलायम होते.

रंग उजळतो यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट त्वचेला नुकसान होण्यापासून वाचवतात आणि रंग उजळवतात.

हे सुद्धा वाचा

डाग पुसट होतात तांदळाच्या पिठाचा नियमित वापर केल्याने डाग हळूहळू पुसट होतात.

त्वचेला मॉइश्चरायझ करते तांदळाचे पीठ त्वचेला हायड्रेत ठेवते आणि त्वचा कोरडी होण्यापासून प्रतिबंधित करते.

तांदळाच्या पिठाचा फेसपॅक कसा बनवायचा : तांदळाच्या पिठात इतर नैसर्गिक घटक मिसळून तुम्ही विविध प्रकारे हा फेसपॅक बनवू शकता.

तांदळाचे पीठ आणि दही दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड असते जे त्वचेला एक्सफोलिएट करते. तांदळाचे पीठ आणि दही एकत्र करून पेस्ट तयार करा आणि चेहऱ्यावर लावा.

तांदळाचे पीठ आणि मध मधामध्ये बॅक्टेरिया विरोधी गुणधर्म असतात जे मुरूमांशी लढण्यास मदत करतात. तांदळाचे पीठ आणि मध एकत्र करून पेस्ट बनवा आणि चेहऱ्यावर लावा.

तांदळाचे पीठ आणि टोमॅटो टोमॅटोमध्ये लाइकोपिन असते जे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे संरक्षण करते. तांदळाचे पीठ आणि टोमॅटोचा रस एकत्र करून पेस्ट तयार करा आणि चेहऱ्यावर लावा.

तांदळाचे पीठ आणि मुलतानी माती मुलतानी माती त्वचेला तेलमुक्त ठेवते. तांदळाचे पीठ आणि मुलतानी माती एकत्र करून पेस्ट तयार करा आणि चेहऱ्यावर लावा.

फेसपॅक लावण्याची योग्य पद्धत :

चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा. तयार फेसपॅक चेहऱ्यावर पातळ थरात लावा. पंधरा ते वीस मिनिटे फेसपॅक चेहऱ्यावर तसाच राहू द्या. थंड पाण्याने धुवा. हा फेसपॅक आठवड्यातून एक ते दोन वेळा वापरा.

या गोष्टी लक्षात ठेवा :

प्रथम तांदळाच्या पिठापासून बनवलेल्या फेसपॅकची पॅच टेस्ट करा आणि तुम्हाला एलर्जी असेल तर वापरू नका. त्वचेशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. डोळ्याभोवती फेसपॅक लावू नका.

एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे.
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे.
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे.
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?.
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता.
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे.
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?.
आमच्या तंगड्यात- तंगड्या अडकलेल्या नाहीत,राऊत यांना शिरसाट यांचे उत्तर
आमच्या तंगड्यात- तंगड्या अडकलेल्या नाहीत,राऊत यांना शिरसाट यांचे उत्तर.
'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत
'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत.
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?.