लग्नसराईत सुंदर दिसायचं तर ‘या’ टिप्स करा फॉलो
रोजच्या व्यस्त वेळापत्रकामुळे पार्लरमध्ये जायला वेळ नसेल तर घरच्या घरी काही टिप्स चा अवलंब करून तुम्ही त्वचेची नैसर्गिकरित्या चमक मिळवू शकता.
काही दिवसातच लग्नसराईला सुरुवात होणार आहे. त्यामुळे लग्नाला जाताना सुंदर दिसण्याची प्रत्येक मुलींची व महिलांची इच्छा असते. ज्यासाठी आपण कपडे, दागिने आणि मेकअप आणि ट्रेंडिंग गोष्टींची खरेदी करत असतो. सुंदर आणि स्टायलिश दिसण्यासाठी आपण अनेक प्रकारचे उपाय करत असतो. पण त्याचबरोबर आपल्याला त्वचेसंबंधित अधिक काळजी घ्यावी लागते.
तुम्हालाही तुमच्या मैत्रिणीच्या किंवा नातेवाईकाच्या लग्नात सुंदर आणि आकर्षक दिसायचं असेल तर आधी आपल्या त्वचेकडे लक्ष द्यावं लागेल. ज्यासाठी अनेक महिला पार्लरमध्ये जाऊन फेशियलही करतात. पण रोजच्या व्यस्त वेळापत्रकामुळे पार्लरमध्ये जायला वेळ नसेल तर घरच्या घरी काही टिप्स चा अवलंब करून तुम्ही त्वचेची नैसर्गिकरित्या चमक मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊयात
त्वचेची योग्य काळजी घेण्याची रुटिंग
वाढत्या प्रदूषणामुळे आपल्या चेहऱ्यावर मुरूम येण्यास व त्वचेवर डाग पडण्यास सुरुवात होते त्यामुळे ऐन लग्नसराईत त्वचेचे नुकसान होऊ लागते. अशा वेळी तुम्ही योग्य स्किनकेअर रूटीन चा अवलंब केला पाहिजे, विशेषत: जर तुमच्याकडे नियमितपणे पार्लरमध्ये जाऊन फेशियल आणि क्लिंजिंग करायला वेळ नसेल तर. यासाठी आठवड्यातून दोनदा तुम्ही चेहऱ्यावर स्क्रब करा. चेहऱ्यावर जास्त पिंपल्स असतील तर स्क्रबिंग टाळा पण त्वचेसंबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्या. यानंतर त्वचेच्या प्रकारानुसार फेसपॅकचा वापर करावा.
घरगुती उपायांचे अवलंब करा
तुमची त्वचा निरोगी आणि चमकदार राहण्यासाठी विविध प्रकारचे घरगुती उपचार देखील वापरू शकता. कारण घरगुती उपायाने नैसर्गिक मार्गाने आपल्या त्वचेचे पोषण होते. जर तुमच्या त्वचेवर जास्त डाग असतील तर तुम्ही बटाट्याचा रस चेहऱ्यावर लावू शकता. याशिवाय हळद, बेसन, मुलतानी माती किंवा चंदनाचा फेसपॅक अशा कोणत्याही प्रकारचा फेसपॅक आठवड्यातून २ वेळा लावता येतो. दरम्यान तुमच्या त्वचेला सूट होतील असे घटक तुम्ही वापरून घरगुती फेसपॅक त्वचेवर लावा.
मसाज किंवा फेशियल एक्सरसाइज
क्लिंजिंग केल्यानंतर तुम्ही जर चेहऱ्यावर मालिश केल्यास त्वचेला आराम मिळतो तसेच त्वचा चमकदार बनते. यासाठी तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर फेस सीरम किंवा तेल तसेच बर्फाने चेहऱ्याला व्यवस्थित मसाज करा. यासाठी तुम्ही फेस रोलरचाही वापर करू शकता. त्याचबरोबर तुम्ही त्वचेवर फेशियल एक्सरसाइज योग्य पद्धतीने केल्यास त्वचा निरोगी आणि चमकदार होण्यास मदत होईल.