Almond face pack: चेहऱ्यावरील मुरुम, पुटकुळ्या, काळे डाग घालवायचेय?; घरच्या घरी बनवलेला बदामाचा ‘हा’ फेसपॅक ट्राय करा!

बदाम व्हिटॅमिन ईचा एक उत्तम स्त्रोत आहे, ज्यामुळे आपली त्वचा मऊ होते. वृद्धत्वविरोधी गुणधर्मांमुळे, बदाम आपल्या चेहर्यावरील सुरकुत्या आणि बारीक ओळी कमी करण्यास मदत करते

Almond face pack: चेहऱ्यावरील मुरुम, पुटकुळ्या, काळे डाग घालवायचेय?; घरच्या घरी बनवलेला बदामाचा 'हा' फेसपॅक ट्राय करा!
फेसपॅक
Follow us
| Updated on: Jul 28, 2021 | 7:49 AM

मुंबई : बदाम व्हिटॅमिन ईचा एक उत्तम स्त्रोत आहे, ज्यामुळे आपली त्वचा मऊ होते. वृद्धत्वविरोधी गुणधर्मांमुळे, बदाम आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि बारीक ओळी कमी करण्यास मदत करते. आपल्या चेहऱ्यावरील मुरुम, डाग, ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्सपासून मुक्त होण्यासाठी बदामाचा फेसपॅक अत्यंत फायदेशीर आहे. विशेष म्हणजे या फेसपॅकमुळे चेहऱ्यावरील सर्व समस्या दूर होण्यास मदत होते. (Almond face pack is beneficial for eliminating many facial problems)

आपल्याला माहीती आहे की, तेलकट त्वचेमुळे त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात. यामुळे ब्रेकआउट्स आणि मुरुम आपल्या चेहऱ्यावर येतो. चेहऱ्यावरील या समस्या दूर करण्यासाठी बदाम आणि मुलतानी माती अत्यंत फायदेशीर आहे. मुलतानी माती जास्त तेल शोषण्यास मदत करते आणि बदाम पावडर आपल्या त्वचेतील घाण काढून टाकण्यास मदत करते. 1 चमचा मुलतानी माती, 2 चमचा बदाम पावडर मिक्स करा. या मिश्रणात गुलाब पाण्याचे काही थेंब मिक्स करा. त्यानंतर याची चांगली पेस्ट तयार करा. हा पॅक आपल्या चेहऱ्याला लावा.

साधारण वीस मिनिटे हा पॅक आपल्या चेहऱ्यावर राहूद्या आणि त्यानंतर आपला चेहरा थंड पाण्याने धुवा. सहा बदाम घ्या आणि त्यांना रात्रभर पाण्यात भिजवा. दुसर्‍या दिवशी त्यांची बारीक करून पेस्ट तयार करा. एक चमचा बदाम पेस्ट घ्या आणि त्यात एक चमचा नारळाचे दूध आणि मध घाला. नारळाच्या दुधाचा हा फेसपॅक चेहर्‍यावर आणि गळ्यावर लावा. काही मिनिटांसाठी हळूवारपणे आपल्या बोटाने त्वचेवर मालिश करा आणि नंतर ते 20 मिनिटांसाठी त्वचेवर ठेवा.

बदामांमध्ये आढळणारे व्हिटॅमिन ई त्वचा आणि केस दोन्हीसाठी फायदेशीर आहे. याशिवाय केसांसाठी बदाम तेलही वापरता येते. बदाम पचविणे एवढे सोपे नाही. पण भिजवलेले बदाम सहज पचतात. याव्यतिरिक्त, हे एंजाइमचे उत्पादन वाढवते, जे पाचन तंदुरुस्त ठेवते. बदामामधील मोनोसॅच्युरेटेड फॅट्स भूकेवर नियंत्रण आणतात. यामुळे आपल्याला वारंवार भूक लागत नाही. ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Almond face pack is beneficial for eliminating many facial problems)

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.