Onion Kitchen Hacks : हे’ आहेत कांद्याचे आश्चर्यकारक फायदे, जाणून घ्या
कांदा हा कोणत्याही पदार्थांची चव वाढवण्यासाठी आघाडीवर आहे. मात्र कांदा आता हा स्वयंपाकघरापुरता मर्यादित राहिलेला नाहीये. कारण कांदा आता खाण्याव्यतिरिक्त केसांचे सौंदर्य वाढवण्यासाठी तसेच अनेक आजार बरे करण्यासाठी फार उपयुक्त ठरत आहे.
कांदा हा कोणत्याही पदार्थांची चव वाढवण्यासाठी आघाडीवर आहे. मात्र कांदा आता हा स्वयंपाकघरापुरता मर्यादित राहिलेला नाहीये. कारण कांदा आता खाण्याव्यतिरिक्त केसांचे सौंदर्य वाढवण्यासाठी तसेच अनेक आजार बरे करण्यासाठी फार उपयुक्त ठरत आहे. त्याचबरोबर कांदा आपल्याला कडक उन्हाळ्यात उष्मघाताच्या त्रास रोखण्याचे काम करतो.
कांद्यांच्या सेवनाने आपल्या शरीरातील अनेक आजार बरे होतात. तर आहाराच्या व्यतिरिक्त तुम्ही कांद्याचा वापर करून अशा काही गोष्टी करू शकता, ज्या तुम्हाला आजपर्यंत कोणीही सांगितल्या नाहीत. आज आम्ही तुम्हाला कांद्याशी संबंधित काही किचन टिप्स सांगणार आहोत.चला तर मग जाणून घेऊयात.
– कांद्याचे सेवन न करता तुम्ही तुमचा खोकला बरा करू शकतात. कसं ते जाणून घेऊयात. कांद्याच्या बारीक फोडी करून या फोडी तुम्ही जिथे आराम करणार आहेत तिथे ठेऊन द्या. तुम्ही झोपल्यावर छातीत जमा झालेला कफ हळूहळू कमी करण्यास मदत होते. तसेच तुम्हाला जर घशात खवखव होत असेल तर कांद्याच्या फोडी मधात मिसळून ठेऊन द्या. त्यांनतर या मधाचे सेवन केल्यास तुमची ही समस्या दूर होईल.
– त्वचेवरून चामखीळ काढून टाकण्यास कांदा फार उपयुक्त आहे. तुमच्या त्वचेवर देखील चामखीळ आहे आणि त्यापासून सुटका मिळवायची असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करून पहा. सर्वात आधी तुम्ही कांद्याची एक फोड घ्या ती तुमच्या त्वचेवर असलेल्या चामखीळवर चोळा आणि रात्रभर कांद्याची फोड चामखीळवर लावून ठेवा. कारण कांद्यामध्ये सल्फर गंध असतो जो चामखीळच्या आत असलेल्या ऊतीवर परिणाम करतो.आणि चामखीळची समस्या काही दिवसातच दूर होईल.
– स्वयंपाकघरात कधी आपल्या दुर्लक्ष झाल्याने शेगडीवर असलेले जेवण करपून जाते. त्यांनतर संपूर्ण स्वयंपाकघरात जळालेल्या अन्नाचा वास येत रहातो. तर अशा वेळेस कांद्यांच्या माध्यम आकारात फोडी करून त्या शेगडीवर ठेऊन द्या. थोड्याच वेळात वास नाहीसा होऊन जाईल.
– केसांना मजबूत करण्यासाठी सुद्धा कांद्याचा वापर केला जातो. कारण कांद्यामध्ये सल्फर भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे केस मजबूत आणि दाट होतात. यासाठी तुम्ही कांद्याचा रस केसांना लावू शकता.
– थंडीच्या दिवसात गाडीच्या काचांवर आरश्यावर दव जमा होतात. यासाठी रात्रीच्या वेळेस फक्त कांदयाची एक फोड घ्या आणि ती गाडीच्या काचेवर आणि आरश्यांवर चोळा. अशाने रात्रभरात गाडीच्या काचांवर दव जमा होणार नाही.