चेहऱ्यावरील सुरकुत्यांची समस्या दूर करण्यासाठी चेहऱ्याला लावा बदाम तेल, गुलाब पाणी आणि नीलगिरीचे तेल

आपण दररोज रात्री झोपण्याच्या अगोदर आपल्या चेहऱ्याला बदाम तेल, गुलाब पाणी आणि नीलगिरीचे तेल लावले पाहिजेत.

चेहऱ्यावरील सुरकुत्यांची समस्या दूर करण्यासाठी चेहऱ्याला लावा बदाम तेल, गुलाब पाणी आणि नीलगिरीचे तेल
आरोग्यदायी त्वचेसाठी करा हे नैसर्गिक उपाय
Follow us
| Updated on: Jul 19, 2021 | 7:43 AM

मुंबई : चमकदार आणि सुंदर त्वचा मिळवण्यासाठी आपण सर्वचजण प्रयत्न करत असतो. त्यासाठी आपण वेगवेगळ्या पावडर, साबण, क्रिम, फेसवाॅश, साैंदर्य उत्पादने देखील वापरतो. मात्र, आपल्याला पाहिजे तशी त्वचा मिळतच नाही. नैसर्गिक सौंदर्य आपल्याला खरोखरच पाहिजे, असेल तर आपण दररोज रात्री झोपण्याच्या अगोदर आपल्या चेहऱ्याला बदाम तेल, गुलाब पाणी आणि नीलगिरीचे तेल लावले पाहिजेत. (Apply almond oil and eucalyptus oil on the face to get rid of facial wrinkles)

ज्यामुळे आपल्या त्वचेच्या सर्व समस्या दूर होण्यास मदत होते. विशेष करून यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. हे तेल घरी तयार करण्यासाठी आपल्याला एक चमचा बदाम तेल, एक चमचा गुलाब पाणी आणि एक चमचा नीलगिरीचे तेल लागणार आहे. हे तेल एकत्र चांगले मिक्स करून घ्या आणि एकजीव करा. त्यानंतर हे तेल दोन तासांसाठी आपल्या चेहऱ्याला लावा.

हे तेल आपण दररोज रात्री किंवा सकाळी लावू शकतो. अँटी-ऑक्सिडंट्सनी समृद्ध, गुलाब पाणी केवळ चेहर्‍याची चमकच वाढवत नाही, तर चेहर्‍याला पोषण देखील देते. जर आपण दररोज रात्री झोपण्याच्या अगोदर संपूर्ण चेहऱ्याला गुलाब पाणी लावले तर आपली त्वचा सुंदर होण्यास मदत होईल. नीलगिरीचे तेल अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांमुळे हे तेल त्वचेचे संक्रमण कमी करण्यास देखील मदत करते. यामुळे त्वचा मऊ आणि डाग मुक्त होते.

हे तेल ज्या ठिकाणी संक्रमण होते तेथेच थेट लावले जाऊ शकते. पण, तेल लावताना त्वचा जास्त घासू नका. बदामांमध्ये व्हिटामिन ई भरपूर प्रमाणात असते. बदाम तेल चेहऱ्यावरील काळे डाग दूर करून, रंग उजळण्यास मदत करते. दररोज रात्री बदामाच्या तेलाने चेहऱ्यावर मसाज करा.  हळूहळू, आपला रंग देखील उजळेल आणि त्वचा चमकू लागेल. चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी बदामाच्या तेल फायदेशीर आहे. या तेलाची मालिश केल्यास चेहऱ्याचं सौंदर्य अधिक खुलायला लागतं.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Skin Care Tips | लग्न करताय? ना ब्यूटी पार्लर, ना ट्रिटमेंट, ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा ग्लो!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Apply almond oil and eucalyptus oil on the face to get rid of facial wrinkles)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.