Skin Care Tips : सुंदर त्वचा मिळवण्यासाठी बेसन पीठ आणि दही चेहऱ्याला लावा!
त्वचा तजेलदार आणि सुंदर करण्यासाठी आपण सर्वज प्रयत्न करत असतो. जर आपल्याला सुंदर त्वचा हवी असेल तर आपण काही घरगुती उपाय केले पाहिजे. ज्यामुळे आपील त्वचा सुंदर दिसण्यास मदत होते.
मुंबई : त्वचा तजेलदार आणि सुंदर करण्यासाठी आपण सर्वज प्रयत्न करत असतात. जर आपल्याला सुंदर त्वचा हवी असेल तर आपण काही घरगुती उपाय केले पाहिजे. ज्यामुळे आपली त्वचा सुंदर दिसण्यास मदत होते. विशेष: या पावसाळ्याच्या हंगामात आपल्या त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात. त्वचा कोरडी पडू लागते. आपण काही घरगुती फेसपॅक वापरले पाहिजेत. (Apply besan flour and curd on the face to get beautiful skin)
दही त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. ते तुमच्या त्वचेचे अतिरिक्त तेल कमी करू शकते. दही आणि बेसन मिक्स करून पेस्ट बनवा. हा फेसपॅक बनवण्यासाठी 2 मोठे बेसन मिसळून त्यात एक चमचा दही घाला. ही पेस्ट लावल्याने मुरुम आणि मुरुमांची समस्या कमी होते. या पेस्टमध्ये एक चिमूटभर हळद घाला. हळदीमध्ये नैसर्गिक गुणधर्म आहेत. जे मुरुमांच्या समस्येपासून मुक्त होण्यास मदत करतात. दही त्वचेच्या छिद्रांना बाहेर काढण्यास मदत करते.
सुंदर त्वचा मिळवण्यासाठी आपण गुलाब पाकळ्या आणि मधाचा फेसपॅक आपल्या चेहऱ्याला लावू शकता. यामुळे आपली त्वचा चमकदार होण्याबरोबरच मुलायम आणि गुलाबी देखील होते. हा फेसपॅक तयार करण्यासाठी दोन चमचे गुलाब पाकळ्यांची पेस्ट आणि चार चमचे मध आपल्याला लागणार आहे. हे दोन्ही एकत्र करून चांगले मिक्स करून घ्या आणि त्याची चांगली पेस्ट तयार करा.
हा फेसपॅक आपल्या संपूर्ण चेहऱ्याला लावा. वीस मिनिटांनंतर आपला चेहरा थंड पाण्याने धुवा. हा फेसपॅक आपण आठ दिवसांमधून दोन वेळा लावला पाहिजे. चंदन आणि दुधाचा फेसपॅक घरच्या घरी तयार करण्यासाठी दोन चमचे चंदन पावडर आणि तीन चमचे दुध घ्या. त्यानंतर याची चांगली पेस्ट तयार करा आणि संपूर्ण चेहऱ्यासोबत मानेला लावा. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि पिंपल्यची समस्या दूर होण्यास मदत होते.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Eczema Myth | ‘एक्झिमा’ आजाराबद्दल लोकांमध्ये संभ्रमाची स्थिती, जाणून घ्या या मागचं पूर्ण सत्य…#eczema | #Health | #skincare | #skincareproducts https://t.co/azKyegZj0a
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 26, 2021
(Apply besan flour and curd on the face to get beautiful skin)