दही आणि बेसन पीठ चेहऱ्याला लावा आणि चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर करा!
दही खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. दह्यामुळे अनेक रोग आपल्यापासून दूर राहतात.
मुंबई : दही खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. दह्यामुळे अनेक रोग आपल्यापासून दूर राहतात. दही हे आपल्या त्वचेसाठी देखील खूप जास्त फायदेशीर आहे. दह्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. दह्यामध्ये बेसन पीठ करून चेहऱ्याला लावा. यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग, पिंपल्स याची समस्या दूर होण्यास मदत होते. (Apply curd and gram flour on the face and get beautiful skin)
विशेष म्हणजे ही पेस्ट आपण आठ दिवसातून दोन ते तीन वेळा आपल्या चेहऱ्याला लावू शकता. एक चमचा हळद आणि दोन चमचे बेसन पीठ घ्या. त्यात एक चमचा मलई आणि थोडे दूध मिसळून त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. हा फेस पॅक कोरडा झाल्यावर कोमट पाण्याने चेहरा धुवा. बेसन पिठात दही आणि गुलाब पाणी देखील मिसळू शकता.
दोन चमचे दही, एक चमचा बेसन पीठ, एक चिमूटभर हळद आणि एक चमचा टोमॅटोचा रस एकत्र घाला आणि 15 मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावा आणि चेहरा थंड पाण्याने धुवा. यानंतर, चेहऱ्यावर कोणतीही क्रिम लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. सुंदर त्वचा मिळवण्यासाठी आपण दही आणि हळदीचा फेसपॅक चेहऱ्याला लावू शकता.
चार चमचे दही, एक चमचा हळद आणि पाच चमचे गुलाब पाणी घ्या. सर्वात अगोदर दह्याची चांगली पेस्ट तयार करून घ्या आणि त्यामध्ये हळद आणि गुलाब पाणी मिक्स करा. ही पेस्ट चांगली मिक्स करा आणि चेहऱ्यावर लावा. साधारण 20 मिनिटे ही पेस्ट चेहऱ्यावर ठेवा आणि त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. यामुळे आपल्या चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Apply curd and gram flour on the face and get beautiful skin)