कडुलिंबाचे तेल, नारळ-बदामाचे तेल त्वचेला लावा आणि सुंदर त्वचा मिळवा!

त्वचा तजेलदार आणि सुंदर करण्यासाठी आपण सर्वज प्रयत्न करत असतो. जर आपल्याला सुंदर त्वचा हवी असेल तर आपण काही घरगुती उपाय केले पाहिजे. ज्यामुळे आपील त्वचा सुंदर दिसण्यास मदत होते.

कडुलिंबाचे तेल, नारळ-बदामाचे तेल त्वचेला लावा आणि सुंदर त्वचा मिळवा!
सुंदर त्वचा
Follow us
| Updated on: Aug 03, 2021 | 2:41 PM

मुंबई : त्वचा तजेलदार आणि सुंदर करण्यासाठी आपण सर्वज प्रयत्न करत असतो. जर आपल्याला सुंदर त्वचा हवी असेल तर आपण काही घरगुती उपाय केले पाहिजे. ज्यामुळे आपील त्वचा सुंदर दिसण्यास मदत होते. विशेष: या पावसाळ्याच्या हंगामात आपल्या त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात. त्वचा कोरडी पडू लागते. आपण काही घरगुती फेसपॅक वापरले तर आपली ही समस्या दूर होण्यास मदत मिळते. (Apply neem oil, coconut and almond oil on the skin)

या हंमागात त्वचा तेलकट आणि कोरडी पडते. ज्यामुळे त्वचेवर पिंपल्स येण्यास सुरूवात होते. मुरुमांपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही कडुलिंबाचा वापर करू शकता. कडुलिंबाचे तेल, नारळ आणि बदामाचे तेल चांगले मिसळून चेहऱ्यावर लावा. यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्सची समस्या दूर होण्यास मदत होते. जर तुम्हाला तेल लावायला आवडत नसेल तर कडुलिंब, हळद आणि दुधाची पेस्ट लावा. ही पेस्ट त्वचेला लावल्यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स जाण्यास मदत होते.

सुंदर त्वचा मिळवण्यासाठी आपण गुलाब पाकळ्या आणि मधाचा फेसपॅक आपल्या चेहऱ्याला लावू शकता. यामुळे आपली त्वचा चमकदार होण्याबरोबरच मुलायम आणि गुलाबी देखील होते. हा फेसपॅक तयार करण्यासाठी दोन चमचे गुलाब पाकळ्यांची पेस्ट आणि चार चमचे मध आपल्याला लागणार आहे. हे दोन्ही एकत्र करून चांगले मिक्स करून घ्या आणि त्याची चांगली पेस्ट तयार करा.

हा फेसपॅक आपल्या संपूर्ण चेहऱ्याला लावा. वीस मिनिटांनंतर आपला चेहरा थंड पाण्याने धुवा. हा फेसपॅक आपण आठ दिवसांमधून दोन वेळा लावला पाहिजे. चंदन आणि दुधाचा फेसपॅक घरच्या घरी तयार करण्यासाठी दोन चमचे चंदन पावडर आणि तीन चमचे दुध घ्या. त्यानंतर याची चांगली पेस्ट तयार करा आणि संपूर्ण चेहऱ्यासोबत मानेला लावा. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि पिंपल्यची समस्या दूर होण्यास मदत होते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा अथवा सौंदर्यतज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Apply neem oil, coconut and almond oil on the skin)

लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?.
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.