Skin Care : ‘हे’ फेसपॅक चेहऱ्याला लावा आणि त्वचेच्या समस्या चुटकीत कमी करा!
बदलेल्या तापमानाचा परिणाम आपल्या त्वचेवर होतो. यामुळे आपली त्वचा तेलकट आणि चिकट होते. त्वचेवरील मुरुमांची समस्या असलेल्या व्यक्तीनी या हंगामात बाहेर पडताना विशेष काळजी घ्यावी.
मुंबई : बदलेल्या तापमानाचा परिणाम आपल्या त्वचेवर होतो. यामुळे आपली त्वचा तेलकट आणि चिकट होते. त्वचेवरील मुरुमांची समस्या असलेल्या व्यक्तीनी या हंगामात बाहेर पडताना विशेष काळजी घ्यावी. आपल्या त्वचेच्या देखभालीत लहानसे बदल करा. आज आम्ही तुम्हाला खास फेसपॅक सांगणार आहोत. ज्यामुळे या हंगामात देखील तुमची त्वचा ताजी आणि तजेलदार राहील. (Apply this face pack on the face and get rid of skin problems in less time)
अॅपल साइडर व्हिनेगर आणि ओट्सचे फेसपॅक आपण घरी तयार करू शकतो. हे तयार करण्यासाठी ओट्सचे पीठ आणि अॅपल साइडर व्हिनेगर मिक्स करावे. हे चांगले मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. हा पॅक कोरडा होईपर्यंत चेहऱ्यावर ठेवा. त्यानंतर स्वच्छ थंड पाण्याने आपला चेहरा धुवा. यामुळे त्वचेला चमक येईल. हे फेसपॅक ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्स काढून टाकण्यास देखील मदत करते. यामुळे त्वचेची पीएच पातळी संतुलित राहते.
हा फेसपॅक घरी तयार करण्यासाठी आपल्याला अर्धी केळी आणि तीन चमचे कोरफड लागणार आहे. सर्वात अगोदर केळी बारीक करून घ्या आणि त्यामध्ये कोरफड मिक्स करून घ्या. यानंतर ही तयार झालेली पेस्ट चेहऱ्यासह मानेवर लावा. तीस मिनिटे ही पेस्ट चेहऱ्यावर तशीच ठेवा आणि थंड पाण्याने चेहरा धुवा, हा खास फेसपॅक आपण आठवड्यातून तीन ते चार वेळा चेहऱ्यावर लावू शकता. यामुळे आपली त्वचा तजेलदार होण्यास मदत होईल.
त्वचा निरोगी आणि चमकदार राहण्यासाठी, लिंबू आणि टोमॅटोचे स्क्रब लावा. यामुळे आपली त्वचा निरोगी आणि ताजी दिसेल. आठवड्यातून 2 ते 3 दिवस हे करायला पाहिजे. तुमची त्वचा नैसर्गिकरित्या मॉइश्चरायईज करणे आवश्यक आहे. उन्हाळ्यातील मॉइश्चरायझिंग ही त्वचेवरील चमक, आर्द्रता आणि मुरुमांपासून मुक्त करण्यास मदत करते. त्वचेमधईल ओलावा कायम राखण्यासाठी सौम्य मॉइश्चरायझर्सची निवड करा. हायल्यूरॉनिक एसिडचा समावेश असलेल्या मॉइश्चरायझर्सचा वापर करा.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Apply this face pack on the face and get rid of skin problems in less time)