Skin Care : तजेलदार त्वचा मिळवण्यासाठी हा फेसपॅक त्वचेला लावा आणि सर्व समस्या दूर करा!
सुंदर त्वचा दिसण्यासाठी आपण नेहमीच वेगवेगळे उपाय करतो. तरीही आपल्याला हवी तशीच त्वचा काही मिळत नाही. जर खरोखरच आपल्याला सुंदर त्वचा हवी असेल तर आपण काही घरगुती उपाय केले पाहिजेत. ज्यामुळे आपली त्वचा सुंदर दिसण्यास मदत होते.
मुंबई : सुंदर त्वचा दिसण्यासाठी आपण नेहमीच वेगवेगळे उपाय करतो. तरीही आपल्याला हवी तशीच त्वचा काही मिळत नाही. जर खरोखरच आपल्याला सुंदर त्वचा हवी असेल तर आपण काही घरगुती उपाय केले पाहिजेत. ज्यामुळे आपली त्वचा सुंदर दिसण्यास मदत होते. चला तर आज आपण काही खास घरगुती फेसपॅकबद्दल जाणून घेऊयात. (Apply this face pack on the skin to get radiant skin)
आपल्या सर्वांनाच माहीती आहे की, बदाम खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. मात्र, बदाम केवळ आरोग्यासाठीच नाही तर आपल्या त्वचेसाठी देखील अत्यंत फायदेशीर आहेत. बदामाचा फेसपॅक चेहऱ्याला लावल्याने त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. यासाठी आपल्याला सहा ते सात बदाम रात्री पाण्यामध्ये भिजू घालावे लागतील. त्यानंतर सकाळी त्या बदामांची बारीक पेस्ट तयार करून घ्या.
त्यानंतर या पेस्टमध्ये गुलाब पाणी मिक्स करा. ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. साधारण वीस मिनिटे ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर राहूद्या. त्यानंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा. हेल्दी त्वचा मिळवण्यासाठी आपण नारळाचे दूध आणि लिंबाचा रस एका वाटीत चांगला मिक्स करून घ्या आणि संपूर्ण चेहऱ्याला लावा. त्यानंतर 20 ते 25 मिनिटे हे आपल्या चेहऱ्यावर तसेच ठेवा आणि त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. यामुळे आपली त्वचा हेल्दी आणि चमकदार दिसण्यास मदत होईल.
विशेष म्हणजे यामुळे आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या जाण्यास देखील मदत होईल. बदामांमध्ये आढळणारे व्हिटॅमिन ई त्वचा आणि केस दोन्हीसाठी फायदेशीर आहे. याशिवाय केसांसाठी बदाम तेलही वापरता येते. बदाम पचविणे एवढे सोपे नाही. पण भिजवलेले बदाम सहज पचतात. याव्यतिरिक्त, हे एंजाइमचे उत्पादन वाढवते, जे पाचन तंदुरुस्त ठेवते. बदामामधील मोनोसॅच्युरेटेड फॅट्स भूकेवर नियंत्रण आणतात. यामुळे आपल्याला वारंवार भूक लागत नाही. ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Apply this face pack on the skin to get radiant skin)