रोज काजळ लावल्याने होतात डार्क सर्कल्स? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कारण

काजळ हे अनेक महिलांच्या आवडत्या सौंदर्य प्रसाधनांपैकी एक आहे. काजळ केवळ तुमचा मेकअप पूर्ण करत नाही तर डोळ्यांना आकार देते. अनेक महिला दररोज काजळ वापरतात पण काजळाच्या नियमित वापरामुळे डार्क सर्कल्स होऊ शकतात का? हे जाणून घेणे आवश्यक आहे.

रोज काजळ लावल्याने होतात डार्क सर्कल्स? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कारण
kareena kapoorImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 13, 2025 | 9:45 AM

जर तुम्ही मराठी मुलगी असाल तर काजळ तुमच्या मेकअपचा एक महत्त्वाचा भाग नक्कीच असेल. काजळ केवळ तुमचा मेकअप पूर्ण करत नाही तर तुमचे डोळे देखील सुंदर बनवते. काही महिला रोज काजळ वापरतात पण काजळ नीट न काढल्याने डोळ्यांभोवती डार्क सर्कल्स आणि पिगमेंटेशन होऊ शकते हे तुम्हाला माहिती आहे का? याचे उत्तर डॉक्टर गुरवीन वरेच यांनी त्यांच्या इंस्टाग्राम व्हिडिओमध्ये दिले आहे. त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये त्यांनी सांगितले आहे की काजळ लावल्याने पूर्णपणे डार्क सर्कल्स होत नाही. परंतु काही विशिष्ट परिस्थितीमध्ये ही समस्या उद्भवू शकते. त्यांनी व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये प्रश्न विचारला आहे की काजळ मुळे डार्क सर्कल्स होऊ शकतात का? जाणून घेऊ कोणत्या सवयीमुळे काजळ लावल्यास डार्क सर्कल्स तयार होतात.

कोणत्या सवयीमुळे होतात काजळ लावल्याने डार्क सर्कल्स?

मेकअप व्यवस्थित न काढणे

दिवसभरातील मेकअप नीट न काढल्यास डोळ्याखाली काजळ जमा होऊ शकते. यामुळे हळूहळू पिगमेंटेशन होऊ शकतात ज्यामुळे डार्क सर्कल्स दिसू लागतात.

वारंवार डोळे चोळणे

जर तुम्हाला डोळे चोळण्याची सवय असेल तर काजळ त्वचेच्या वरच्या थरात जाऊ शकते. पुन्हा पुन्हा डोळ चोळल्याने ही समस्या वाढते.

परि-ऑर्बिटल एक्जिमा किंवा त्वचारोग

परि-ऑर्बिटल एक्जिमा किंवा त्वचारोग असल्यास काजळ लावल्याने डार्क सर्कल्स वाढू शकतात. एक्झिमामुळे त्वचेचा बाह्य स्तर आधीच कमकुवत झालेला असतो. त्यामुळे काजळचे रंगद्रव्य त्वचेत सहजपणे जाऊ शकतात आणि डार्क सर्कल्स तयार होतात.

डार्क सर्कल्स टाळण्यासाठी टिप्स

मेकअप काढण्याची सवय लावा: रोज रात्री झोपण्यापूर्वी काजळ आणि मेकअप पूर्णपणे काढून टाका. यासाठी तुम्ही सौम्य क्लिंजर किंवा मेकअप रिमूवर वापरू शकता.

डोळे चोळणे टाळा: डोळे चोळणे टाळा. कारण त्यामुळे त्वचेवर ताण येतो आणि डार्क सर्कल्स होण्याचा धोका वाढतो.

मॉइश्चराइज करा: डोळ्याखालील त्वचा हायड्रेट आणि मॉइश्चराइज ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी डोळ्यांसाठी खास बनवलेले हलके क्रीम वापरा.

योग्य उत्पादने निवडा: काजळ आणि इतर मेकअप उत्पादने खरेदी करताना त्यांची गुणवत्ता लक्षात ठेवा. खराब काजळमुळे ॲलर्जी होऊ शकते. त्यामुळे तुमच्या डोळ्यांना हानी पोहोचू शकते.

'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?.
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया.
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले...
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले....
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?.
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली.
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या.
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन.
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ.
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं शोले स्टाईलनं आंदोलन; काय आहेत मागण्या?
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं शोले स्टाईलनं आंदोलन; काय आहेत मागण्या?.
मुख्यमंत्री-ठाकरे गटाच्या भेटीगाठी वाढल्या; भाजप दक्ष, ठाकरेंवर लक्ष?
मुख्यमंत्री-ठाकरे गटाच्या भेटीगाठी वाढल्या; भाजप दक्ष, ठाकरेंवर लक्ष?.