बेसन पीठ, हळद आणि दह्याचा फेसपॅक चेहऱ्यासाठी अत्यंत फायदेशीर, वाचा!
आपली त्वचा निरोगी आणि चमकदार दिसण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही एक खास फेसपॅक सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची त्वचा सुंदर होईल.
मुंबई : त्वचा निरोगी आणि चमकदार दिसण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही एक खास फेसपॅक सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची त्वचा सुंदर होईल. हा फेसपॅक तयार करण्यासाठी आपल्याला बेसन पीठ, हळद आणि दही लागणार आहे. यासाठी सर्वात अगोदर बेसन पीठ आणि हळद मिक्स करा. त्यानंतर त्यामध्ये दही मिक्स करून चांगली पेस्ट तयार करा. त्यानंतर ही पेस्ट संपूर्ण चेहऱ्याला लावा. साधारण वीस मिनिटे ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर राहूद्या आणि त्यानंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा. (Besan flour, turmeric and curd face pack is beneficial for the skin)
ही पेस्ट आपण आठवडयातून किमान दोन वेळा लावली पाहिजे. यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स दूर होण्यास नक्की मदत होईल. हरभरा डाळ भाजून घ्या. यानंतर, डाळ दुधात भिजवून घ्या आणि ही डाळ चांगली भिजल्यानंतर त्याची बारीक पेस्ट करून घ्या. ही पेस्ट किमान एक ते दीड तास चेहर्यावर लावा. चेहऱ्यावर फेस पॅक लावलेला असताना, कुणाशीही बोलू नका किंवा हावभाव करू नका. अन्यथा, त्वचा सैल होईल. सुकल्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा.
दही हा एक उत्तम प्रोबायोटिक पदार्थ आहे. त्यामध्ये असलेले सूक्ष्मजीव आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरते. दही अँटिऑक्सिडेंट म्हणून काम करते. दह्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. याव्यतिरिक्त झोपेची समस्या दूर करण्यातही दही फायदेशीर आहे. केसांवर आणि त्वचेवर दही लावल्याने त्याचे चांगले परिणाम दिसू लागतात. डोक्यातील कोंडा टाळण्यासाठी केसांना दही लावणे फायदेशीर ठरते. यासाठी केसांना दही लावून अर्ध्या तासाने केस धुवावे.
सुंदर त्वचा मिळवण्यासाठी आपण दही आणि हळदीचा फेसपॅक चेहऱ्याला लावू शकता. यासाठी चार चमचे दही, एक चमचा हळद आणि पाच चमचे गुलाब पाणी लागणार आहे. सर्वात अगोदर दह्याची चांगली पेस्ट तयार करून घ्या आणि त्यामध्ये हळद आणि गुलाब पाणी मिक्स करा. ही पेस्ट चांगली मिक्स करा आणि चेहऱ्यावर लावा. साधारण 20 मिनिटे ही पेस्ट चेहऱ्यावर ठेवा आणि त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. यामुळे आपल्या चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Winter Diet | थंडीच्या दिवसांत रिकाम्या पोटी ‘या’ पदार्थांच्या सेवनाने राहील शरीर तंदुरुस्त!https://t.co/Znr5WfzLhp#Winter #diet #Food #health
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 11, 2020
(Besan flour, turmeric and curd face pack is beneficial for the skin)