Skin Care : चमकदार आणि सुंदर त्वचेसाठी बॉडी लोशन अत्यंत आवश्यक, वाचा अधिक!
बॉडी लोशन सामान्यतः लोक प्रत्येक ऋतूमध्ये वापरतात. बॉडी लोशन लावल्याने तुमची त्वचा खूप मऊ आणि चमकदार होते. अशा परिस्थितीत हिवाळा येताच त्वचेतील आर्द्रता कमी होऊ लागते. त्यामुळे त्वचेवर पुरळ आणि अनेक समस्या होतात. अशा परिस्थितीत बॉडी लोशन त्वचेसाठी रामबाण औषधापेक्षा कमी नाही.
मुंबई : बॉडी लोशन सामान्यतः लोक प्रत्येक ऋतूमध्ये वापरतात. बॉडी लोशन लावल्याने तुमची त्वचा खूप मऊ आणि चमकदार होते. अशा परिस्थितीत हिवाळा येताच त्वचेतील आर्द्रता कमी होऊ लागते. त्यामुळे त्वचेवर पुरळ आणि अनेक समस्या होतात. अशा परिस्थितीत बॉडी लोशन त्वचेसाठी रामबाण औषधापेक्षा कमी नाही. परंतु प्रत्येकजण आपल्या त्वचेवर एकच लोशन वापरतो.
एकाच प्रकारचे बॉडी लोशन शक्यतोवर वापरू नये. खरं तर बॉडी लोशन हे त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठीच आहे. बॉडी लोशन हे तुमच्या त्वचेसाठी अन्नासारखे आहे. शरीराला जशी अन्नाची गरज असते, तसेच बॉडी लोशन हे तुमच्या त्वचेच्या गरजेनुसार असते.
योग्य बॉडी लोशन कसे निवडावे?
जेव्हा तुम्ही तुमचे स्वतःचे बॉडी लोशन खरेदी करता तेव्हा तुमची त्वचा कोणत्या प्रकारची आहे हे नेहमी लक्षात ठेवा. तुमच्या त्वचेचा प्रकार लक्षात घेऊन बॉडी लोशनची खरेदी करा. नेहमी लोशनच्या घटकांकडे लक्ष दिले पाहिजे की ते तुमच्या त्वचेसाठी योग्य आहेत की नाही.
-जर तुमची त्वचा तेलकट असेल तर नेहमी अल्फा हायड्रॉक्सी अॅसिड असलेले लोशन वापरा. कारण अशाप्रकारे, लोशनच्या वापरामुळे तुमच्या त्वचेवरील तेलावर नियंत्रण राहील आणि त्वचेतील बॅक्टेरिया सक्रिय होण्यास प्रतिबंध करण्यात मदत होईल.
-अनेकांची त्वचा खूप कोरडी असते. अशा परिस्थितीत या प्रकारच्या त्वचेसाठी लोशन निवडताना, आपण ग्लिसरीन, मॅकॅडॅमिया तेल, बदामाचे तेल, गुलाबजल, शिया बटर आणि ऑलिव्ह ऑइल असलेली निवडा. या गोष्टी असलेले लोशन आपल्या त्वचेला चमक देते.
-अनेक लोकांची त्वचा अतिशय संवेदनशील असते. या प्रकारची त्वचा असलेल्यांनी लोशन निवडताना विशेष काळजी घ्यावी. अशी त्वचा असणाऱ्यांनी व्हिटॅमिन-ई, ग्लिसरीन, गुलाबपाणी, ग्रीन टी आणि कॅमोमाइल यांसारखे घटक असलेले लोशन वापरावे.
हे अत्यंत महत्वाचे
लोशन लावण्याची एक योग्य पद्धत देखील आहे. जेव्हा तुम्ही लोशन वापरता तेव्हा तुमची त्वचा नेहमी कोरडी आणि स्वच्छ असावी. आंघोळीनंतर, त्वचा पूर्णपणे पुसून टाका आणि नंतर फक्त मऊ त्वचेवर लोशन लावा. अशा वेळी लोशन त्वचेत लवकर शोषले जाते. दिवसा हलके लोशन वापरा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही रात्री झोपण्यापूर्वीही शरीर स्वच्छ केल्यानंतर लोशन वापरू शकता.
संबंधित बातम्या :
बाजारात मिळणाऱ्या उटण्याचा कंटाळा आलाय? , घरच्या घरी बनणारे 4 उटण्याचे प्रकार नक्की ट्राय करा
सावधान! चहा, नाश्ता एकत्र करताय? अनेक आजारांना निमंत्रण देताय
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Body lotion beneficial for glowing and beautiful skin)