लग्नाआधी वधूला महागात पडू शकते ही एक चूक, बिघडू शकते लग्नाची तयारी

लवकरच लग्नसराईला सुरुवात होणार आहे. लग्नसोहळ्यात नववधूसाठी तिचा मेकअप अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते. पण त्यापूर्वी तुम्ही या टीप्स वापरल्यात तर तुम्ही नववधूच्या लूकमध्ये नक्कीच उठून दिसाल

लग्नाआधी वधूला महागात पडू शकते ही एक चूक, बिघडू शकते लग्नाची तयारी
Follow us
| Updated on: Nov 10, 2024 | 10:34 AM

लवकरच लग्नसराईला सुरुवात होणार आहे. लग्नसोहळा म्हटलं की लग्नात बरीच तयारी करावी लागते. त्यात वधूसाठी सर्वात मोठी गोष्ट असते ती म्हणजे तिचा मेकअप. जर मेकअप सुंदर असेल तर लग्नाच्या दिवशी नववधू एखाद्या अप्सरापेक्षा कमी दिसत नाही. अशावेळी नववधूने लग्नाआधी मेकअप आणि ड्रेसची तयारी करणं गरजेचं आहे. लग्न सोहळ्याच्या गडबडीत अनेकदा लग्नाआधी नववधूकडून काही चुका होतात, ज्यामुळे ऐन लग्नाच्या दिवशी मोठा घोळ होऊ शकतो. चला मग जाणून घेऊया, अशाच काही चुकांबद्दल ज्या नववधूने लग्नापूर्वी नक्कीच लक्षात ठेवल्या पाहिजेत.

लग्नाआधी करु नका या चुका

– नववधूने ब्राइडल मेकअप करताना चेहऱ्यावर जास्त मॉइश्चरायझर लावणे टाळावे. जर लग्न हिवाळ्यात असेल तर या दिवसात ब्राइडल मेकअप करताना वॉटर बेस्ड फाऊंडेशन लावण्यापूर्वी त्यात सीरम किंवा फेस ऑइलचे काही थेंब मिक्स करून मगच ते चेहऱ्यावर लावा. अन्यथा फाऊंडेशन ड्राय पडायला वेळ लागणार नाही.

– त्याचबरोबर ब्राइडल मेकअप करताना शेड्सचाही विचार करावा लागतो. अशा वेळेस नववधूने मेकअप आर्टिस्टला डीप शेड्स लावण्यास सांगू नये. असं केलं नाही तर तुमचा एकंदर लूक लपला जाईल. यावेळी लक्षात ठेवा की ओठ किंवा डोळे, या दोन गोष्टींपैकी फक्त एका गोष्टीला बोल्ड शेड द्या. दोघांना एकत्र बोल्ड शेड दिला तर चेहऱ्यावर तुम्हाला हवा तसा लुक येणार नाही. या काळात जास्त ब्लशचा वापर करू नये. त्यासोबत तुमच्यावर फाऊंडेशन बेस अप्लाय होत असेल तर तो चेहऱ्यासोबत मान, खांदे, पाठ आणि हातावर देखील करावा.

– लग्नाच्या काही दिवसआधी नववधूने कोणत्याही तेलकट पदार्थांचे सेवन करू नये, अन्यथा चेहऱ्यावर मुरूम येऊ शकतात. त्यासोबत हेही लक्षात ठेवले पाहिजे कि नववधूला जरा एखाद्या त्वचेशी संबंधित प्रॉडक्ट वापरताना शंका येत असेल तर ते प्रॉडक्ट वापरू नये. चेहऱ्यावर अशा कोणत्याच गोष्टींचा वापर करू नये, ज्याने त्वचा खराब होईल.

– या दिवसांमध्ये पाणी पिणे कमी करू नका नाहीतर तुमची त्वचा कोरडी पडू शकते. नववधूने लग्नाच्या एक आठवड्याआधीच वॅक्सिंग करावे. जर लग्नाच्या दोन ते तीन दिवस आधी वॅक्स केल्यास त्वचेवर लालसरपणा येऊ शकतो.

अश्याच काही बारीक गोष्टींच्या चुका नववधूने लग्नाआधी करणे टाळावे. जेणेकरून लग्नामध्ये तुम्ही नववधूच्या लूकमध्ये उठून दिसाल.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.