Skin Care Tips | कोको पावडर त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर, नियमित वापराचे फायदे वाचा…

त्वचेच्या काळजीसाठी खोबरेल तेलामध्ये कोको पावडर मिक्स करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि वीस मिनिटांनी आपला चेहरा थंड पाण्याने धुवा. यामुळे त्वचेचा कोरडेपणा लवकर दूर होतो. कारण ते त्वचेसाठी योग्य एक्सफोलिएटर म्हणून काम करते. त्वचा हायड्रेटेड, मऊ आणि चांगली ठेवण्यासाठी वरील उपाय नक्कीच करून पाहा.

Skin Care Tips | कोको पावडर त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर, नियमित वापराचे फायदे वाचा...
Image Credit source: femina.in
Follow us
| Updated on: May 17, 2022 | 1:22 PM

मुंबई : कोको पावडर (Cocoa powder) म्हटंले की, सर्वांच्या डोळ्यांसमोर येतो तो केक. कारण आपल्या घरामध्ये कोको पावडर फक्त केक तयार करण्यासाठीच आणले जाते. कोको पावडरच्या मदतीने झक्कास चॉकलेट केक तयार करता येतो. जगभरात केकची वेगळीच क्रेझ (Craze) आहे. भारतामध्ये देखील केकची मागणी खूप जास्त वाढली आहे. मात्र, बाहेरील केक खाण्यापेक्षा महिला जास्त प्रमाणात घरीच केक तयार करतात. मात्र, केक तयार करण्यासाठी आपण जी कोको पावडर आणतो ती फक्त केकसाठीच उपयुक्त नसून कोको पावडर आपल्या त्वचेसाठी देखील खूप जास्त फायदेशीर आहे. कोको पावडरच्या मदतीने आपण त्वचेच्या (Skin) असंख्य समस्या नक्कीच दूर करू शकतो. विशेष म्हणजे कोको पावडर केसांसाठीही गुणकारी आहे. चला तर मग कोको पावडरचे त्वचेला होणारे फायदे, सविस्तरपणे जाणून घेऊयात.

हानिकारक अतिनील किरण

कोको पावडरमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. जे तुमच्या त्वचेला हानिकारक अतिनील किरणांपासून दूर ठेवण्यास मदत करतात. कॉफीमध्ये एक चमचा कोको पावडर मिक्स करा आणि ही पेस्ट चेहऱ्यासह मानेवर व्यवस्थित लावा. हे त्वचेसाठी नैसर्गिक सनस्क्रीन म्हणून काम करेल. त्वचेच्या विविध समस्या दूर करण्यास मदत करेल.

हे सुद्धा वाचा

कोको पावडर आणि खोबरेल तेल

त्वचेच्या काळजीसाठी खोबरेल तेलामध्ये कोको पावडर मिक्स करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि वीस मिनिटांनी आपला चेहरा थंड पाण्याने धुवा. यामुळे त्वचेचा कोरडेपणा लवकर दूर होतो. कारण ते त्वचेसाठी योग्य एक्सफोलिएटर म्हणून काम करते. त्वचा हायड्रेटेड, मऊ आणि चांगली ठेवण्यासाठी वरील उपाय नक्कीच करून पाहा.

कोको पावडरमधील घटक

कोको पावडरमध्ये अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम आणि ओमेगा 6 फॅटी अॅसिड असतात. कोको पावडर मुक्त रॅडिकल्स विरुद्ध लढण्यासाठी, त्वचेची उष्णता कमी करण्यासाठी आणि त्वचेचे पुनरुत्पादन करण्यासाठी, मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यासाठी मदत करते. यामुळे नेहमीच त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण जास्तीत-जास्त कोको पावडर वापरले पाहिजे.

कोको वापडर आणि मध

उन्हाळ्याच्या हंगामामध्ये त्वचेवरील टॅनची समस्या दूर करण्यासाठी आपण कोको पावडर वापरू शकतो. टॅनची समस्या झटपट दूर करण्यासाठी कोको पावडर फायदेशीर आहे. यासाठी दोन चमचे कोको पावडर घ्या आणि त्यामध्ये एक चमचा मध मिक्स करा. त्यानंतर ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. यामुळे टॅन दूर होण्यास मदत होते.

(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.