Skin Care : केसांच्या आणि त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर ‘नारळाचे तेल’, जाणून घ्या कसे?
नारळाचे तेल लोह आणि तांबे समृद्ध आहे. जे लाल रक्तपेशी (आरबीसी) राखण्यास मदत करते. या व्यतिरिक्त, हे पोटावरील चरबी कमी करण्यास मदत करते. हे साखरेची पातळी नियंत्रित करून हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते. यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स असतात जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
मुंबई : नारळ हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. नारळाच्या तेलाचा वापर स्वयंपाक, त्वचेची काळजी आणि केसांची काळजी घेण्यासाठी केला जातो. त्याचे अनेक फायदे आहेत. नारळाच्या तेलामध्ये प्रथिने, जीवनसत्वे आणि खनिजे असतात. जे चयापचय आणि हाडांसाठी फायदेशीर आहे. (Coconut oil is extremely beneficial for hair and skin)
नारळाचे तेल लोह आणि तांबे समृद्ध आहे. जे लाल रक्तपेशी (आरबीसी) राखण्यास मदत करते. या व्यतिरिक्त, हे पोटावरील चरबी कमी करण्यास मदत करते. हे साखरेची पातळी नियंत्रित करून हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते. यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स असतात जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
नारळाचे विविध फायदे
1. नारळाचा पांढरा भाग कच्चा खाऊ शकतो आणि अनेक खाद्यपदार्थांची चव वाढवण्यासाठी देखील वापरला जातो.
2. नारळाच्या पाण्याचे अनेक फायदे आहेत. जे शरीराला ऊर्जा देण्यास मदत करतात. हे शरीराला हायड्रेटेड ठेवते.
3. त्यात असलेल्या क्रीमला मलाई म्हणतात जे खाण्यास अतिशय चवदार असते आणि आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.
4. सुक्या खोबऱ्याचा वापर नारळाचे तेल बनवण्यासाठी केला जातो.
1. नारळाचे तेल केसांसाठी फायदेशीर
बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक प्रकारच्या हेअर ऑइल, मास्क आणि शॅम्पूमध्ये नारळाचे तेल वापरले जाते. हे आपल्या केसांना मॉइस्चराइज करण्यास मदत करते. हे आपले खराब झालेले केस पोषण करून दुरुस्त करण्यास मदत करते. रोज नारळाचे तेल लावल्याने केस जलद वाढतात तसेच चमकदार देखील होतात.
2. नारळाचे तेल त्वचेसाठी फायदेशीर
नारळाचे तेल आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असते. मॉइस्चरायझर्स, फेस मास्क, लिप बाम, फेस ऑइल आणि सीरममध्ये नारळाचे तेल वापरले जाते. नारळामध्ये अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-बॅक्टेरियल गुण असतात. जे त्वचेच्या समस्या दूर करण्यास मदत करतात. याशिवाय, ते त्वचेला मॉइश्चरायझिंग करण्यास मदत करते. यात वृद्धत्व विरोधी गुणधर्म आहेत. जे सुरकुत्या कमी करण्यास देखील मदत करते.
3 स्काल्पची काळजी घेतात
जास्त उष्णता आणि आर्द्रतेमुळे आपल्या केसांच्या मुळांचे मोठे नुकसान होते. नारळ तेलामध्ये अँटी-फंगल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असल्याने, हे तेल स्काल्पची चांगली काळजी घेण्यात आणि डोक्यातील कोंडा, कोरडेपणा किंवा कोणताही संसर्ग इत्यादी सर्व समस्यांपासून मुक्त करण्यात हे प्रभावी आहे. केस आणि केसांची मुळे तेलकट बनवण्यातील मुख्य घटक म्हणजे टाळूवर स्थायिक होणारे सेबम, हे देखील नारळ तेल काढून टाकते.
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Coconut oil is extremely beneficial for hair and skin)