Skin Care : चेहरा स्क्रब करण्यासाठी वापरा ‘कॉफी’, त्वचेला मिळतील अनेक फायदे!
त्वचेचा मृत थर दूर करण्यासाठी स्क्रब हे सर्वात फायदेशीर आहे. एक्सफोलिएशनसाठी बाजारात अनेक प्रकारचे फेस स्क्रब उपलब्ध आहेत. तुम्ही होममेड स्क्रब देखील वापरू शकता. जर आपल्या तजेलदार आणि सुंदर त्वचा हवी असेल तर आपण स्क्रब करणे आवश्यक आहे. कारण जोपर्यंत त्वचेचा मृत थर जात नाही.
मुंबई : त्वचेचा मृत थर दूर करण्यासाठी स्क्रब हे सर्वात फायदेशीर आहे. एक्सफोलिएशनसाठी बाजारात अनेक प्रकारचे फेस स्क्रब उपलब्ध आहेत. तुम्ही होममेड स्क्रब देखील वापरू शकता. जर आपल्याला तजेलदार आणि सुंदर त्वचा हवी असेल तर आपण स्क्रब करणे आवश्यक आहे. कारण जोपर्यंत त्वचेचा मृत थर जात नाही. तोपर्यंत आपली त्वचा तजेलदार होणार नाही. यासाठी आपण काही खास घरगुती उपाय देखील करू शकता.
आपण बघितले असेल की, अनेकांना कॉफी प्यायला प्रचंड आवडते. मात्र, ही कॉफी फक्त आपल्या आरोग्यासाठीच नाहीतर ही आपल्या त्वचेसाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे. कॉफीच्या मदतीने आपण चेहऱ्यासाठी एक खास स्क्रब घरच्या-घरी तयार करू शकतो. हे स्क्रब बनवण्यासाठी तुम्हाला 1 कप कॉफी, 1 कप ब्राऊन शुगर आणि 1 चमचे मध लागेल. प्रथम एका भांड्यात कॉफी पावडर, ब्राऊन शुगर आणि मध टाका. ते चांगले मिसळा. ते आवश्यक प्रमाणात घ्या.
या स्क्रबने काही मिनिटे चेहऱ्याला मसाज करा. त्यानंतर ताज्या पाण्याने धुवा. या स्क्रबमुळे आपल्या त्वचेवरील मृत थर दूर होण्यास मदत होईल. हा फेस स्क्रब आपण आठ दिवसातून दोनदा आपल्या चेहऱ्याला लावला पाहिजे. यामुळे त्वचेच्या इतरही समस्या दूर होण्यास मदत होते. मात्र, एकदाच स्क्रबची पेस्ट तयार करून ठेऊ नका. दरवेळी फेस स्क्रबची पेस्ट ताजीच तयार करा. जर हा फेस स्क्रब चेहऱ्याला लावल्यानंतर आपल्याला जळजळ होत असेल तर लगेचच चेहरा कोमट पाण्याने धुवा.
मध आणि ब्राऊन शुगर स्क्रब तयार करण्यासाठी, एक चमचा कच्च्या मधामध्ये, एक चमचा ब्राऊन शुगर घाला. आता त्यात एक चमचा नारळ तेल किंवा ऑलिव्ह तेल घाला. दोन ते तीन थेंब सुगंधी तेल घाला आणि मिक्स करा. आता ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावा आणि 10 मिनिटांसाठी मसाज करा. यानंतर ते 5 मिनिटे ही पेस्ट चेहऱ्यावर राहू द्या आणि नंतर पाण्याने स्वच्छ करा.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!
Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Coffee scrub is extremely beneficial for the face)